शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाची घटना मूक; कारवाई नाहीच

By admin | Updated: October 1, 2015 01:09 IST

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारपत्रकावर श्रीपाल सबनीस यांनी पूर्वपरवानगी न घेता महामंडळ अध्यक्षांचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

पुणे : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारपत्रकावर श्रीपाल सबनीस यांनी पूर्वपरवानगी न घेता महामंडळ अध्यक्षांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. या संदर्भात आलेल्या तक्रार अर्जानुसार महामंडळाच्या घटनेचा अभ्यास केला असता अशा घटना मूक असल्याचे दिसून येते. कारवाईसंदर्भात काहीही लिहिलेले नसल्याने कारवाई करता येत नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले. या निर्णयामुळे सबनीसांची उमेदवारी कायम असल्याचे ते म्हणाले.पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात अलेले प्रा. श्रीपाल सबनीस यांनी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांचा प्रचारपत्रकावर फोटो आणि मजकूर प्रसिद्ध केला आहे. ही प्रचारपत्रके ते मतदारांना पाठवीत आहेत. हा प्रकार मतदारांवर दबाव टाकणारा असल्याची तक्रार अनिल कुलकर्णी यांनी निर्वाचन अधिकाऱ्यांकडे मंगळवारी केली. या तक्रार अर्जाची दखल घेऊन निर्वाचन अधिकाऱ्यांनी प्रा. सबनीस आणि डॉ. वैद्य यांना मंगळवारीच खुलासा करण्याची नोटीस बजावली. तक्रार अर्जासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर निर्वाचन अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘‘सबनीस यांनी मंगळवारी सायंकाळीच खुलासा पाठविला, तर वैद्य यांनी आज खुलासा पाठविला आहे. सबनीस यांच्या खुलाशात म्हटले आहे की, औरंगाबाद येथे अर्ज भरल्यानंतर श्रीपाल सबनीस विचार मंचचे महेश थोरवे-पाटील यांनी अनेक साहित्यिकांच्या प्रतिक्रिया एकत्र करून प्रचारपत्रक पाठविले. वैद्य यांच्या २०१३मधील प्रस्तावनेच्या चार ओळी त्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. अध्यक्ष म्हणून त्यांचा कुठेही उल्लेख नाही. वैद्य यांची या संदर्भात संमती घेणे नजरचुकीने राहिले आहे. वैद्य यांनी इंग्रजीत खुलासा केला असून, सबनीस यांनी संपर्क साधला नसून संमतीही दिली नसल्याचे खुलाशात म्हटल्याचे आडकर म्हणाले.