शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

भोर पंचायत समितीवर महिलाराज

By admin | Updated: September 15, 2014 05:20 IST

सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भोर पंचायत समितीत राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी

भोर : सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भोर पंचायत समितीत राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी आताही कायम ठेवत सभापतिपदी राष्ट्रवादीच्या नंदा शेडगे यांनी काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांचा पराभव करत विराजमान झाल्या, तर उपसभापतिपदी शिवसेनेच्या रोहिणी बागल यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे पंचायत समितीत महिलाराज आले आहे. नंदा शेडगे यांनी काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांचा ६ विरुद्ध ० मतांनी पराभव केला. भोर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी संजय आसवले यांनी काम पहिले. या वेळी तहसीलदार राम चोबे, गटविकास अधिकारी संजय गायकवाड, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, पक्षनिरीक्षक शांताराम इंगवले, मानसिंग धुमाळ, कुलदीप कोंडे, रमेश कोंडे, शरद ढमाले, भालचंद्र जगताप, संतोष घोरपडे, अमोल पांगारे, अनिल पवार, रणजित शिवतरे, आबा शेडगे, तृप्ती खुटवड, वंदना धुमाळ, स्वाती कुंभार, हसिना शेख, विठ्ठल श्ािंदे, प्रकाश तनपुरे, यशवंत डाळ, सुनील धुमाळ उपस्थित होते.सभापतिपद इतरमागास प्रवर्गासाठी राखीव होते. या पदासाठी राष्ट्रवादीकडून नंदा शेडगे, तर काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी उमेदवारीअर्ज दाखल केले होते; तर उपसभापतिपदासाठी शिवसेनेच्या रोहिणी बागल यांचा एकमेव अर्ज होता. सकाळी १० वा. अर्ज भरल्यावर दुपारी २ वा निवडणूकप्रक्रियेला सुरुवात झाली. काँग्रेसकडून सभापतिपदासाठी अर्ज दाखल करून मतदानात भाग घेण्याअगोदरच सतीश चव्हाण व सुवर्णा मळेकर सभागृहाबाहेर गेले. त्यानंतर हातवर करून झालेल्या मतदानात नंदा शेडगे यांना ६, तर चहाण यांना ० मते मिळाली. उपसभापतिपदी रोहिणी बागल बिनविरोध निवडून आल्या. मतदानप्रक्रियेत माजी सभापती सुनीता बाठे, रणजित शिवतरे, संतोष घोरपडे, अमोल पांगारे यांनी भाग घेतला २०१२ रोजी झालेल्या पं. स निवडणुकीत ८ पैकी राष्ट्रवादीला ४, तर शिवसेनेला व कॉँग्रेसला प्रत्येकी २ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी झाली व राष्ट्रवादीचा सभापती, तर शिवसेनेचा उपसभापती झाले. (वार्ताहर)