शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

महादेव तांबडे कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक

By admin | Updated: January 5, 2017 01:12 IST

प्रदीप देशपांडे पुणे शहराचे अप्पर पोलिस आयुक्त

कोल्हापूर : कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून महादेव तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागी असलेले प्रदीप देशपांडे यांची दक्षिण विभाग पुणे शहरच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी पदोन्नतीवर नियुक्ती झाली. गृह विभागाने बुधवारी हे आदेश जारी केले. देशपांडे यांना १४ महिन्यांसाठी कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार मिळाला. जिल्हा पोलिस अधीक्षक देशपांडे हे नॅशनल पोलिस अकॅडमी हैदराबाद येथे ४० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गेले असताना त्यांचा पदभार एम. बी. तांबडे यांच्याकडे सोपविला होता. यादरम्यान त्यांच्यासमोर नगरपालिका निवडणुकांचे आव्हान होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेवून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेतली. ते सध्या पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या (सीआयडी) पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. देशपांडे यांनी १४ महिन्यांच्या कालावधीत सहकाऱ्यांना आपुलकी, जिव्हाळा आणि खंबीर पाठिंबा दिला. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येच्या तपासामध्ये काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. (प्रतिनिधी)कोल्हापूरशी माझे भावनिक नाते आहे. माझे या ठिकाणी शिक्षण झाले. माझ्या कर्मभूमीचे ऋण फेडण्याची संधी मला यानिमित्ताने मिळाली. पोलिस कर्मचाऱ्यांना नवीन घरे तसेच नवीन उपक्रम राबविण्यामध्ये मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, त्याला यश मिळाले. - प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक