या वेळी मनसेचे पुणे शहराध्यक्ष हेमंत बत्ते, पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, जनहित कक्ष शिरूरचे शहराध्यक्ष रवी लेंडे, मनसे वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष सुनील खेडकर, मनसे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, मनसे महिला सेना प्रतिनिधी तारा पठारे, किरण गव्हाणे, बंडू दुधाणे, नाना लांडे, बाळासाहेब कुंभार, सागर चव्हाण, विराज शिंदे, नीलेश आरगडे, गणेश साळुंके, अजय झेंडे उपस्थित होते.
महेबूब सय्यद म्हणाले की, गेल्या दीड- दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तसेच गावा-गावांतील सर्वधर्मीयांची मंदिरे, मस्जिद, चर्च बंद ठेवण्यात आलेले आहेत. सध्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यातील गावा-गावांतील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू झालेले आहेत. एवढेच नव्हे तर राज्यांतर्गत व जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुध्दा सुरळीतपणे चालू आहे. कोरोनाचे नियम शिथिल केल्याने विविध गावच्या बाजारपेठा ग्राहकांनी गजबजलेल्या आहेत. असे असले तरीही अद्याप सर्वसामान्य जनतेची अध्यात्माची मंदिरे, मस्जिद, चर्च बंद ठेवण्यात आलेली आहेत. ती सुरू करण्यासाठी मनसेच्या वतीने महागणपती मंदिरासमोर महाआरती केली आहे.
०१ रांजणगाव गणपती
रांजणगाव गणपती येथील श्री क्षेत्र महागणपती मंदिरासमोर मनसेच्या वतीने सुरू असलेली महाआरती.
010921\img_20210901_153144.jpg
रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरासमोर मनसेच्या वतीने महाआरती करण्यात आली.