शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माळीणकरांची उभारी समाजाला प्रेरणा देणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:41 IST

माळीणकरांच्या भावना दु:खी असल्या, तरी ते सावरून धैर्याने उभे राहत आहेत, त्यांची उभारी समाजाला प्रेरणा देणारी आहे. आज तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आदर्श माळीण उभे करण्याचा संकल्प करू

घोडेगाव : माळीणकरांच्या भावना दु:खी असल्या, तरी ते सावरून धैर्याने उभे राहत आहेत, त्यांची उभारी समाजाला प्रेरणा देणारी आहे. आज तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आदर्श माळीण उभे करण्याचा संकल्प करू, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले.माळीण दुर्घटनेचा तृतीय पुण्यस्मरण दिन दुर्घटनाग्रस्त ठिकाणी वाचलेल्या शाळेच्या आवारात घेण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ, परिसरातील लोक उपस्थित होते. दुर्घटनेच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या स्मृतिस्तंभावर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून मृत आत्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर शाळेच्या आवारात श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला. या वेळी तहसीलदार रवींद्र सबनिस, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपअभियंता एल. टी. डाके, पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, उपसभापती नंदा सोनावले, माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, जिल्हा परिषद सदस्या रूपा जगदाळे, पंचायत समिती सदस्य संजय गवारी, आशाताई शेंगाळे, इंदुबाई लोहकरे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन मधुअप्पा बोºहाडे इत्यादी उपस्थित होते.या वेळी ग्रामस्थांच्या वतीने मच्छिंद्र झांजरे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात काही ग्रामस्थांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये सावळेराम लेंभे, कैलास झांजरे, तुकाराम लेंभे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत नवीन गावाबद्दल तक्रारी करीत काही मागण्या केल्या.