शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

माझा दृष्टिकोन बदलला : किरण राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 20:25 IST

गावात एकदाही राहिले नव्हते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावांना भेट देण्याची संधी मिळाली.

पुणे, दि. 27 - गावात एकदाही राहिले नव्हते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावांना भेट देण्याची संधी मिळाली. लोक किती वर्ष दुष्काळ सहन करीत आहेत, पाण्याअभावी त्यांचे किती हाल होत आहेत, हे ऐकल्यानंतर मन हेलावून गेले. या परिस्थितीतही पाणीप्रश्नावर एकत्रित येऊन चांगलं काहीतरी घडवण्याची त्यांची इच्छा आहे, हीच त्यांच्यामधील सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह पाहिल्यानंतर माझा दृष्टिकोन बदलला असल्याची भावना पाणी फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि दिग्दर्शिका किरण राव यांनी व्यक्त केली.प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याने एका मुलाखतीमध्ये देशातील असहिष्णुतेचे वातावरण पाहून पत्नी किरण राव हिला देश सोडून जावे का? असे वाटत असल्याचे सांगून वादाला तोंड फोडले होते. समाजासह सोशल मीडियावर त्याच्या या विधानावर टीकेची झोड उठली होती. या पाश् भूमीवर किरण राव यांना विचारलेल्या प्रश्नावर  माझा दृष्टीकोन बदलला असल्याचे सूचकपणे सांगत या वादाला एकप्रकारे पूर्णविराम दिला. पानी फौंडेशनच्या माध्यमातून गावांना भेटी देताना आलेले अनुभव कथन केले. सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेच्या माध्यमातून  ‘तुफान आलिया’ हा शो सुरू करण्यात आला होता. स्पर्धेच्या 45 दिवसांच्या कालावधीत केवळ स्टुडिओमध्ये बसून यावर चर्चा न घडविता आमीर आणि किरण यांनी गावोगावी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे वार्तांकन केले होते, त्या अनुभवाविषयी सांगताना किरण राव म्हणाल्या गावातील लोकांनी आपल्या अडचणी मांडल्या, त्यांचे प्रश्न सांगितले तेव्हा ख-या अर्थाने मनाची कवाडे खुली झाली. लोकचळवळीतून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासंबंधीची माहिती लोकांना दिली तेव्हा या चळवळीबददल लोकांमध्ये उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळाली. कितीतरी गावांमध्ये महिला घराचा उंबरठा ओलांडू शकल्या नव्हत्या. खिडकीतूनच घरी आलेल्या पाहुण्यांना पाहाण्याची त्यांना मुभा होती, पण या चळवळीमुळे त्यांना घरातून बाहेर पडण्यास  प्रोत्साहन मिळाले. या चळवळीत सहभागी होण्यासाठी एका मुलीने आपले लग्न पुढे ढकलले. सकारात्मकतेचे जग एकेक गाव व्यापत चालले असल्याचे पाहायला मिळाले, एका प्रश्नासाठी लोकशक्ती एकत्र येऊ शकते या उत्साहामुळेच माझा दृष्टीकोन बदलला असल्याचे त्यांनी सांगितले.