शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १ हजार ६७0 शाळांना कुलूप

By admin | Updated: February 6, 2016 01:43 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या १ ते ६ फेब्रुवारीदरम्यान नवी मुंबई येथे होत असलेल्या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक शिक्षक रजेवर गेल्याने

पुणे : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या १ ते ६ फेब्रुवारीदरम्यान नवी मुंबई येथे होत असलेल्या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक शिक्षक रजेवर गेल्याने सोमवारपासून १ हजार ६७0 शाळांना कुलूप लागले होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या रजाप्रकरणी ताशेरे ओढल्यानंतर यातील काही शिक्षक शुक्रवारी शाळेत दाखल झाल्याने यातील काही शाळा सुरू झाल्याचा दावा शिक्षणाधिकारी मुश्ताख शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. अधिवेशनासाठी प्रवासाच्या दिवसासह कमाल ६ दिवसांची (१ ते ६ फेब्रुवारी २०१६ पर्यंतची) विशेष नैमित्तिक रजा शासनाने २९ जानेवारीच्या परिपत्रकाद्वारे मंजूर केली होती. याचा फायदा घेत शिक्षकांनी रजा टाकल्या. जिल्ह्यात ३ हजार ७२९ जिल्हा परिषदेच्या शाळा असून, त्यांच्यासाठी १२ हजार ६0 शिक्षक मंजूर आहेत. यातील ११ हजार ५00 शिक्षक सध्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. यातील ६ हजार ८६७ शिक्षक या परिपत्रकाचा आधार घेत रजेवर गेले. त्यामुळे १ हजार ६७0 शाळा बंद ठेवाव्या लागल्या. या शिक्षकांनी गटशिक्षक अधिकाऱ्यांना रजेचा अर्ज दिला असून, त्यांच्याकडूनच रजा मंजूर करून घेतल्या. मुळात गटशिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यात किती शाळा आहेत, यात एकशिक्षकी किती, दोनशिक्षकी किती, या शाळांवरील किती शिक्षकांनी रजा घेतली आहे याचा आढावा घेणे गरजेचे होते. मात्र सरसकट रजा मंजूर केल्याने शाळा बंद ठेवाव्या लागल्या.शिक्षक मात्र, प्रत्यक्षात ६ दिवस अधिवेशनाला न जाता अनेक शिक्षक घरीच राहून सुट्टी ‘एन्जॉय’ करीत असल्याची चर्चा शाळेत उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांमध्ये आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये सध्या अघोषित सुट्टी आहे. (प्रतिनिधी)जवळपास अर्धे शिक्षक उपस्थित नसल्याने अनेक शाळा उर्वरित शिक्षक चालवीत आहेत. प्रत्यक्षात अधिवेशन २ दिवस आहे; पण त्यापूर्वीच ४ दिवस सुट्टी दिली गेली आहे.अधिवेशनासाठी उपस्थित शिक्षकांना उपस्थितीचे प्रमाणपत्र दिले जाते; पण सहकाऱ्यांची प्रमाणपत्रे प्रत्यक्ष उपस्थित राहणारे आणतात किंवा ती त्यांना पोहोचविली जातात, असे सांगितले जाते.यातील काही शिक्षक अधिवेशनाला गेले नाहीत, पण शाळेतील अनेक जण सुटीवर जाणार असतील, तर जबाबदारी आपल्यावर येईल, या धास्तीने त्यांनीही अधिवेशनाची सुट्टी घेतली. अधिवेशन सुट्टीच्या कालावधीत घेता येऊ शकते; पण त्या वेळच्या हक्काच्या सुट्टीवर गदा शिक्षकांना नको असते. म्हणून शालेय कामकाजाच्या दिवसात अशी अधिवेशने आयोजित केली जातात.