शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पंजाने थोपवली कमळाची लाट

By admin | Updated: February 26, 2017 03:50 IST

महापालिका निवडणुकीत भाजपाच्या कमळ चिन्हाच्या लाटेत अनेक जण वाहून गेले, मात्र काँग्रेसच्या काही दिग्गजांनी त्यातही आपली नौका बरोबर तीराला लावली.

पुणे : महापालिका निवडणुकीत भाजपाच्या कमळ चिन्हाच्या लाटेत अनेक जण वाहून गेले, मात्र काँग्रेसच्या काही दिग्गजांनी त्यातही आपली नौका बरोबर तीराला लावली. पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्या प्रभाग क्रमांक २० चा त्यात समावेश होतो. या प्रभागात त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी होती. शिंदे यांच्यासह काँग्रेसचे तिघे व राष्ट्रवादीही एक जागा म्हणजे आघाडीचे संपूर्ण पॅनलच विजयी झाली. शहरात इतरत्र काँग्रेस व राष्ट्रवादीची संपूर्ण पॅनल कोसळत असताना आघाडीने या प्रभागात यश मिळवले. प्रभागात काम, लोकसंपर्क असला की लाटही थोपवता येते याचे हे उदाहरण आहे.अरविंद शिंदे, चाँदबी हाजी नदाफ व लता राजगुरू हे काँग्रेसचे व प्रदीप गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अशा चारही उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली. चौघांमधील चाँदबी हाजी नदाफ वगळता उर्वरित तिघेही विद्यमान नगरसेवक आहेत. भाजपाने कल्पना बहिरट, विशाल शेवाळे यांच्याबरोबर जमाल शरीफ शेख व शबनम यासीन शेख असे उमदेवार देत मतांसाठी राजकीय चलाखी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. विजयी उमेदवारांच्या तुलनेत त्यांना फारशी मते मिळाली नाहीत. त्याऐवजी बहुजन समाज पक्षाच्या सूर्यकांत निकाळजे सुविधा त्रिभुवन, सुमन गायकवाड व सचिन शिंदे या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली. निकाळजे तर शिंदे यांच्यापेक्षा १ हजारपेक्षा जास्त मतांनी सुरुवातीच्या फेरीत आघाडीवर होते.ड गटात शिंदे यांना १२ हजार ४६४ मते मिळाली. बसपाच्या निकाळजे यांना ७ हजार २५७ मते मिळाली, तर भाजपाच्या जमाल शरीफ शेख यांना फक्त ४ हजार ५४२ मते मिळाली. क गटात लता राजगुरू यांनी ९ हजार ७७७ मते मिळाली. त्या विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या जमाल शरीफ शेख यांना ६ हजार ३९९, तर बसपाच्या त्रिभुवन यांना ५००९ मते मिळाली. ब गटामध्ये काँग्रेसच्या चाँदबी हाजी नदाफ यांनी ११ हजार १६१ मते मिळवून विजयी झाल्या. बसपाच्या सुमन गायकवाड यांना ७ हजार ८०६ मते मिळाली. भाजपाची उमेदवारी करीत असलेल्या कल्पना बहिरट यांना ९ हजार ११४ मते मिळाली. अ गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप गायकवाड ११ हजार ७१७ मते मिळवून विजयी झाले. भाजपाच्या विशाल शेवाळे यांना ६ हजार ७४७, तर बसपाच्या सचिन शिंदे यांना ६ हजार ७०७ मते मिळाली. बसपाच्या उमेदवारांना थोडा अधिक वेळ मिळाला असता तर त्यांनी आघाडीच्या उमदेवारासमोर आव्हान उभे केले असते, हेही स्पष्ट दिसते.प्रभाग क्रमांक २० मध्ये आघाडीचे पॅनलया भागातील रहिवासीही थोड्या सोसायट्यांचा अपवाद वगळता सर्वसाधारण, मध्यमवर्गीय, कष्टकरीच आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार शहराच्या अन्य भागात थेट भाजपाकडे वळलेला असताना या भागात मात्र त्याने काँग्रेसलाच मतदान केल्याचे दिसते आहे. तसेच त्यांनी दुसरी पसंती भाजपाला न देता बसपाला दिल्याचेही निदर्शनास येते. काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांना ते नगरसेवक असल्याचा फायदा झाला, मात्र अन्य प्रभागांमध्ये नगरसेवकही पराभूत होत असताना त्यांनी आपल्या जागा कायम ठेवल्या हे उल्लेखनीय आहे. याशिवाय आघाडीमुळे दोन्ही पक्षांना फायदा झाला. - अन्य प्रभागांप्रमाणेच याही प्रभागात नोटाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. एकूण मतदान ३० हजार ६६६ झाले. त्यापैकी तब्बल ४ हजार ३८२ मते नोटाची आहेत. इतक्या मतदारांना एकही उमेदवार पसंत पडला नाही, असा याचा सरळ अर्थ आहे.