शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रसिकांनी लुटला गीतांचा आनंद

By admin | Updated: April 25, 2016 02:47 IST

शास्त्रीय संगीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या सांगीतिक कार्यक्रमात डॉ. कल्याणी बोंद्रे यांनी एकाच रागाच्या माध्यमातून अनेक

पुणे : शास्त्रीय संगीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या सांगीतिक कार्यक्रमात डॉ. कल्याणी बोंद्रे यांनी एकाच रागाच्या माध्यमातून अनेक भावरंग वेगवेगळ्या गायन प्रकारातून उलगडून दाखवले.आतापर्यंत केलेल्या अनेक मैफलींच्या शृंखलेतला हा अजून एक अनोखा कार्यक्रम होता. बिहाग रागातील ‘नवनीत भावे’ ही मध्यलय झपतालातील बंदिश व त्याला जोडून द्रूत तीनतालातील सुप्रसिद्ध बंदिश ‘लट उलझी सुलझा जा बालमा’ यांच्या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी दाद दिली. ‘मम आत्मा गमला’ हे नाट्यगीत गाऊन त्यांनी आपल्या अष्टपैलू गायकीची पावती दिली. भावरंग रागांचे या संकल्पनेनुसार त्यांनी ‘तेरे सूर और मेरे गीत’ यासारखी अजरामर सिनेगीते गाऊन कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढवत नेली.शास्त्रीय संगीतातील बंदिश आणि तराण्याच्या गायनाबरोबरच नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावसंगीत व चित्रपट संगीतातील काही रागांवर आधारित आकर्षक गीते यांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. याचप्रकारे बागेश्री व खमाज हे राग व त्यांचे भावरंग डॉ. कल्याणी यांनी वेगवेगळ्या रचनांमधून सादर केले. यामध्ये बागेश्रीतील अतिद्रुत लयीतील तीनतालात सादर केलेला तराणा रसिकांचा विशेष आवडीचा ठरला व खमाजमधील प्रसिद्ध गुजराथी भजन ‘वैष्णव जन तो’ हे उत्स्फूर्त दाद मिळवून गेले. मैफलीची सांगता भैरवी भजनाने झाली. उपेंद्र सहस्रबुद्धे (हार्मोनियम), अमित जोशी, (तबला), वसंत देव (तालवाद्य), गीतांजली हराळ (तानपुरा) यांनी साथसंगत केली.