शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे बाजारसमितीचा लेखापरीक्षणाला खो

By admin | Updated: May 10, 2014 20:27 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन व पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या तीन वर्षांचे लेखापरीक्षणच केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तीन वर्षांचे लेखापरीक्षणच नाही : पणन संचालकांनी घेतली झाडाझडती पुणे : राज्यातील सर्वांत मोठ्या बाजार समितीत गणल्या जाणार्‍या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन व पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या तीन वर्षांचे लेखापरीक्षणच केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी या प्रकरणी पुणे बाजार समितीच्या प्रशासकांचे कान टोचले असून, लवकरच मुंबई बाजार समितीची देखील झाडाझडती घेण्यात येणार आहे. पणन संचालकांनी राज्यातील बाजार समितीच्या कारभाराचा आढावा घेण्याची मोहिम हाती घेतली आहे. लातुर, नागपूर विभाग व मुंबई बाजार समिती वगळता इतर बाजार समितींना त्यांनी भेट दिली आहे. गेल्या आठवड्यात पुणे बाजार समितीच्या कारभाराची त्यांनी झाडाझडती घेतली. शेतकरी व बाजार घटकातील व्यक्तींच्या तक्रारींवर देखील त्यांनी सुनावणी घेतली. याबाबत डॉ. माने म्हणाले, मुंबई व पुणे या राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत. मात्र तेथे प्रशासकीय शिस्त आजिबात पाळली जात नाही. पुणे बाजार समितीने तर तीन वर्षांचे लेखापरीक्षणच केलेले नाही. त्यांना तातडीने लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतमालाचा लिलाव केला जातो की नाही ? बाजार समितीचा सेस योग्य पद्धतीने भरला जातो की नाही ? याची बाजार समितीने काटेकोर तपासणी केली पाहीजे. मात्र अशी तपासणीच होत नाही. मे महिनाअखेरीस पुणे बाजार समितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल. त्याचबरोबर मुंबई बाजार समितीची देखील लवकरच बैठक बोलावण्यात येणार आहे. तर आडते, बाजार निरीक्षकांवर कारवाई गुलटेकडी मार्केटयार्डात बहुतांश आडते कृषी मालाचा लिलावच करीत नसल्याची माहिती समोर आली आहे. कृषी मालाचा लिलाव करणे बंधनकारक आहे. तसेच मालाचा लिलाव होतो की नाही, हे पाहण्याची जबाबदारी बाजार निरीक्षक व पर्यवेक्षकांची आहे. कृषी मालाचा लिलाव न करणार्‍या आडत्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, तर कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अधिकार्‍यांवर देखील कारवाई केली जाईल, असे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी स्पष्ट केले.