शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाच्या फुगवट्याने महापालिकेला २०० कोटींचा तोटा

By admin | Updated: May 7, 2014 01:29 IST

गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पातील फुगवट्यामुळे पुणे महापालिकेला २०० कोटी रुपयांचा आर्थिक तोटा झाला आहे.

- वर्गीकरणाचे प्रस्ताव ढकलेले पुढे पुणे : गेल्या वर्षी अर्थसंकल्पाचा फुगवटा करण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेला अपेक्षित उत्पन्नापेक्षा २०० कोटीचा वाढीव खर्च झाला आहे. ३१ मार्च अखेरची सर्व बिले अद्याप प्राप्त न झाल्याने हा तोटा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर स्थायी समितीने सुमारे ६७ लाखाचे वर्गीकरणाचे प्रस्ताव पुढे ढकलत पुढील आठवड्यात जमा-खर्चाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत महापालिकेचे अर्थिक उत्पन्नाने अद्याप ३००० कोटींचा टप्पा अद्याप ओलंडलेला नाही. तरीही फुगवटा केलेल्या अर्थसंकल्पाने ३६०० कोटीवरून ४००० कोटीपर्यंत उसळी मारली आहे. मात्र, त्याचे पडसाद स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत उमटले. महापालिकेला मार्च अखेर सुमारे २९०० कोटींचे उत्पन्न मिळाले असून, खर्च मात्र ३१०० कोटीहून अधिक वाढणार आहे. सध्या २०० कोटीचा तोटा दिसत असलातरी अद्याप खर्चा सर्व बिले जमा झालेली नाहीत. त्यामुळे ही तूट २०० कोटीहून अधिक वाढण्याची शक्यता स्थायी समितीच्या बैठकीत महापालिकेच्या अधिका-यांनी व्यक्त केली. तूट व तोटा भरून न निघाल्यास महापालिकेच्या बँकेतील ठेवी मोडाव्या लागतील, अशी भिती आयुक्त विकास देशमुख यांनी व्यक्त केली. दरम्यान, स्थायी समितीच्या दुस-या महिन्यांच्या कार्यपत्रिकेवर सुमारे ६७ लाख रुपयांचे वर्गीकरणाचे प्रस्ताव आले होते. मात्र, महापालिकेच्या अर्थसंकल्पातील तूट आणि जमा-खर्चातील तोटा २०० कोटीहून अधिक वाढण्याची भिती प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे वर्गीकरणाचे प्रस्ताव पुढे ढकलण्यात आले आहेत. महापालिकेच्या जमा-खर्चाचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी सांगितले. ------------------- होर्डींगमुक्त रस्त्यांचा प्रस्ताव...शहरातील काही प्रमुख रस्त्यावर होर्डींग उभारण्यास बंदी करण्याचा आकाश चिन्ह विभागाचा प्रस्तावाला स्थायी समितीने संमती दिली. त्यानुसार कोणत्या रस्त्याची निवड करायची आणि त्याचा महापालिकाला होणारा अर्थिक तोटा यांचा विचार करून धोरण तयार करण्याचे आदेश आकाशचिन्ह विभागाला दिले आहेत, असे कर्णे यांनी सांगितले. ------------------चार निरीक्षकांच्या बदल्या...महापालिकेने १० मेपूर्वी शहरातील पथारी व हातगाडींचे सर्व्हेक्षण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. मात्र, बनावट पावत्याद्वारे पथारींची नोंदणी करण्याचा प्रकार उजेडात आला. तसेच, ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत संथ गतीने काम करणा-या चार निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश स्थायी समितीच्या बैठकीत आज देण्यात आले. ------------------