शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘सुजलाम्’ला अखेर टाळे

By admin | Updated: May 26, 2017 05:48 IST

येथील रासायनिक प्रकल्पातील सुजलाम् केमिकल्स या कंपनीला अवैधरीत्या अमली पदार्थ उत्पादन केल्यामुळे अखेर टाळे ठोकण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : येथील रासायनिक प्रकल्पातील सुजलाम् केमिकल्स या कंपनीला अवैधरीत्या अमली पदार्थ उत्पादन केल्यामुळे अखेर टाळे ठोकण्यात आले. जवळपास चोवीस तास चाललेल्या तपासात अमली पदार्थविरोधी पथक व गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. यामध्ये या कंपनीचा मालक हरिश्चंद्र दोरगेला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी दोरगेला मुंबई येथे मुद्देमालासह अटक केल्यानंतर कुरकुंभ येथील त्याची कंपनी जिथे तो अवैधरीत्या अमली पदार्थ बनवत होता त्या सुजलाम केमिकल्समध्ये छापा टाकला. यामध्ये अमली पदार्थ बनवण्याचा कच्चामाल जप्त करण्यात आला आहे. तपासात विविध पुरावे, कंपनीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. त्यावर पुढील कार्यवाहीसाठी अटक करून अमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत या कंपनीशी निगडित असणारी सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. त्यामुळे या पुढेही आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सुजलाम् केमिकल्सचा मालक दोरगे हा स्वत: केमिकल इंजिनिअर असून, अमली पदार्थ बनवण्याचे काम तो खुद्द करीत असल्याची माहिती मिळत आहे. जास्त करून रात्रीच्या वेळी कंपनी चालवून कामगारांना या प्रकारपासून होईल तितके दूर ठेवूनच काम करीत होता. यामध्ये त्याने कमालीची गुप्तता पाळली होती. रासायनिक प्रक्रियेची कामगारांना माहिती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असल्याचे बोलले जात आहे.दोरगेने मोठ्या प्रमाणात माया जमा केली असल्याची माहिती समोर येत आहे. आलिशान गाड्या, विविध ठिकाणी स्थावर मालमत्तादेखील असल्याचे बोलले जात असल्यामुळे अमली पदार्थ बनवण्याचा त्याचा धंदा खूप दिवसापासून सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका छोट्याशा जागेत सुरूअसणाऱ्या कंपनीत अवैधरीत्या अमली पदार्थ उत्पादन करून ते तो बाजारात विकत. त्यावर काय कार्यवाही होणार का हे पाहणे गरजेचे आहेकुरकुंभ : सहा महिन्यांपूर्वी समर्थ लॅब या कंपनीतून अशाच प्रकारे मेफेड्रीन या अमली पदार्थाचे अवैधरीत्या उत्पादन करून बाजारात पाठविले जात होते. त्याही वेळी करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली होती. तर, सुजलाम् केमिकल्स कंपनीने त्यापुढे दोन पावले जाऊन अशाच प्रकारे करोडोंचे मेफेड्रीन उत्पादन करून एकच खळबळ उडवून दिली आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांमध्ये केले जाणारे उत्पादन, त्यांना लागणारा कच्चा माल, विविध रसायनांचा साठा यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. तरीही, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाचे धाडस कंपनीमालक करीत आहेत. याचा अर्थ, ज्या यंत्रणा हे तपासणीचे काम करतात, त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.