शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

भरदिवसा दहावीच्या चौघा मुलांना मारहाण करून लुटले

By admin | Updated: February 5, 2017 00:47 IST

तिघांना अटक : मेरी वेदर मैदानासमोरील घटना

कोल्हापूर : दहावीचा निरोप समारंभ कार्यक्रम उरकून घरी जाणाऱ्या चौघा शाळकरी मुलांना तिघा लुटारूंनी मारहाण करून व चाकूचा धाक दाखवून लुटले. त्यांच्याकडून चार मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेत ते पसार झाले. शनिवारी भरदिवसा साडेअकराच्या सुमारास मेरी वेदर मैदानावरील फुटपाथवर ही घटना घडली. भयभीत झालेल्या मुलांनी घरी जाऊन पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी मुलांनी लुटारूंचे सांगितलेले वर्णन आणि सीसीटीव्ही फुटेजवरून तिघा लुटारूंना अवघ्या पाच तासांत अटक केली. संशयित रोहित राजू जाधव (रा. न्यू शाहूपुरी), पवन वसंत पुजारी (रा. विचारे माळ), श्रेयस सुगंधकुमार दिलपाक (रा. कावळा नाका) अशी त्यांची नावे आहेत. चैनीसाठी लूटमार केल्याची त्यांनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, अभिषेक अजित वाळवेकर (वय १६), श्रावण यशवंत शेट्टी (१६), प्रथमेश संजय सुर्वे (१६), प्रणव शैलेंद्र गाडेकर (१६, सर्व रा. रमण मळा, कसबा बावडा) हे चौघे सेंट झेवियर्स स्कूलमध्ये दहावीमध्ये शिकतात. शनिवारी त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर हे चौघे चालत घरी निघाले होते. मेरी वेदर मैदानासमोरील फुटपाथवरून जात असताना पाठीमागून मोटारसायकलवरून तिघे तरुण आले. त्यांनी या चौघांना अडवून थेट मारहाण केली. अचानक घडलेल्या प्रकाराने चौघेही बिथरून गेले. तिघांपैकी एका तरुणाने चाकू दाखविताच भीतीने तिघेही थरथरले. यावेळी चौघांच्या खिशातील मोबाईल व पैसे काढून त्यांनी पलायन केले. या रस्त्यावरून वाहनधारकांची ये-जा सुरू होती. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. मारहाण होत असताना या मुलांची विचारपूस करण्याचे धाडस कोणीही केले नाही. चौघाही मुलांचे अंग भीतीने घामाघूम झाले होते. त्यांनी तेथून थेट घर गाठले. त्यानंतर चौघांचेही पालक शाहूपुरी पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांची भेट घेऊन माहिती दिली. भरदिवसा या रस्त्यावर लूटमार झाल्याने पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी) लूटमारीचा प्लॅनरोहित जाधव हा दहावी नापास आहे. पवन पुजारी व श्रेयस दिलपाक हे कदमवाडी येथील भारती विद्यापीठमध्ये दहावीमध्ये शिकतात. तिघेही मित्र आहेत. पुजारीच्या वडिलांची मोटारसायकल आहे. त्यावरून हे तिघेजण फिरत असत. रोहित जाधव याला पैशाची गरज होती. त्यामुळे या तिघांनी शाळेच्या मुलांना लुटण्याचा प्लॅन आखला. मोबाईल काढून ते विक्री करून त्यातून पैसे मिळवणार होते. चैनीसाठीच त्यांनी लूटमार केल्याचे पोलिसांनी सांगितले.