बारामती : दुचाकीवरून घरी जात असताना भामट्यांनी रस्त्यात अडवून 68 हजार रूपयांचा ऐवज लुबाडून नेल्याचा प्रकार आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. डोळ्याच्या दवाखान्यात उपचार केल्यानंतर घरी जात असताना पल्सर गाडीवर आलेल्या भामटयांनी रस्त्यात अडवून त्यांच्याकडील दागिने, रोख रक्कम, मोबाईल आदी ऐवज नेला. बारामती एमआयडीसी आणि शहरातील व्हिल कॉलनी परिसरात घडलेल्या या दोन घटनांनी खळबळ उडाली
या प्रकरणी सुनील श्रीरंग मेरगळ (कौठडी, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली. मेरगळ पत्नी माधुरी यांच्यासह पेन्सील चौकातून एमआयडीसी मार्गे साद्री अॅग्रो फार्म हाऊसच्या परिसरातून जात दुचाकी गाडीवरून जात होते. त्यांचा पाठलाग करीत पल्सर गाडीवर आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखविला, मारहाण केली. क्लजवायर तोडली. त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, सोन्याचे दागिणो, रिंगा, आदी 68 हजार रूपयांचा ऐवज लुबाडून नेला. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. अधिक तपास बारामती शहर पोलिस करीत आहेत.
सोन्याची चेन हिसकावून नेली
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेल्याचा आज भर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. भामटे दुचाकीवरून आले होते. बारामती शहर पोलिस सुत्रंनी दिलेल्या माहितीनुसार स्मिता सुभाष ढवळीकर (रा. व्हील कॉलनी बारामती) या पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या भामटय़ांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यांच्या जवळ येऊन गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला. ढवळीकर यांनी आरडा ओरडा केला. परंतू चोरटे दुचाकीवरून पसार झाले. ैअधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले करीत आहे.