शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या पॅकेजकडे साखर कारखानदारांच्या नजरा

By admin | Updated: January 19, 2015 23:21 IST

साखरेचे भाव कोसळत असल्याने संकटात असलेल्या साखर कारखानदारीला केंद्रशासन बुधवारी (दि. २१) किती पॅकेज जाहीर करणार,

सोमेश्वरनगर : साखरेचे भाव कोसळत असल्याने संकटात असलेल्या साखर कारखानदारीला केंद्रशासन बुधवारी (दि. २१) किती पॅकेज जाहीर करणार, याकडे कारखानदारांसह, ऊसउत्पादकांच्या नजरा लागून आहेत. कारण या पॅकेजवरच एफआरपी मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यासंदर्भात उद्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहेत. शनिवारी मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन अडचणीतील साखर कारखानदारीच्या समस्या मांडल्या होत्या. यामध्ये साखर निर्यातीसाठी टनाला ५ हजार अनुदान, वीस लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी आदी मागण्या केल्या होत्या. ऊस उत्पादकांना उचित भाव देण्यासाठी दि. २१ रोजी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी टनाला ७०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून शॉर्ट मार्जिनमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचे डोळे उद्याच्या होणाऱ्या बैठकीकडे लागले आहेत. उद्याच्या बैठकीत केंद्र सरकारने भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना अच्छे दिन आणावेत, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. साखर निर्यातीचा निर्णय झाल्यास साखरेला उठाव मिळून साखरेच्या दरात सुधारणा होईल.कारखादारांनो एफआरपी द्या; अन्यथा कारवाई करू, संचालकांवर गुन्हे दाखल करू, असा सज्जड दम सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. मात्र, आर्थिक परिस्थितीने हतबल झालेले साखर कारखानदार काहीच करू शकत नव्हते. दरम्यान, शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी मागील आठ दिवसांपूर्वी साखर आयुक्त कार्यालयात तोडफोड केल्यावरच राज्य सरकारला खडबडून जाग आली. एफआरपी द्या; अन्यथा गोदामे सील करण्याचा इशारा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. मात्र, गोदामे सील करून एफआरपीचा गुंता सुटणार नव्हता. यासाठी साखरेचे दर वाढविले अथवा कारखान्यांना अनुदान जाहीर करणे हेच मार्ग होते. सहकारमंत्र्यांच्या या वक्तव्यावर नाराज साखर कारखादारांनी गोदामे खुशाल सील करा, अशी भूमिका घेत सरकारनेच ३२०० रुपयांनी साखरेची खरेदी करावी, अशी मागणी केली होती. गेल्या वर्षी साखरेचे दर कोसळल्याने राज्यातील साखर कारखानदारी शॉर्ट मार्जिनमध्ये गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचे पैसे देता यावेत, यासाठी केंद्र सरकारने अबकारी कराची रक्कम परत करत देशातील साखर कारखानदारीला ऊर्जितावस्था देण्यासाठी ६६०० कोटी रुपयांची बिनव्याजी मदत केली होती. या वेळी महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला २१०० कोटी रुपये वाट्याला आले होते. या वर्षीही गेल्या वर्षीपेक्षा बिकट परिस्थिती आहे. राज्यातील साखर कारखान्यांची एफआरपी २२०० ते २३०० रुपये बसत असताना राज्य बँकेने हंगाम सुरू झाल्यापासून साखरेचे मूल्यांकन ३ वेळा कमी करून शेतकऱ्यांना देण्यासाठी कारखानदारांच्या हातात अवघे १३१५ रूपयेच ठेवले आहेत. मग ९०० ते १००० रूपयांचा अपुरा दुरावा कसा भरून काढणार, असा प्रश्न कारखानदारांना पडला आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने दिलेले बिनव्याची कर्ज फेडणेच बाकी असताना आता पुन्हा कर्ज न देता टनाला ७०० रुपये अनुदान द्यावे. हे अनुदान देत असताना ते कारखानदारांच्या हातात न देता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. तसेच गेल्या वर्षी दिलेल्या कर्जाला मुदतवाढ द्यावी; कारण या कर्जाचा एक जरी हप्ता चुकला तर त्याला १५ टक्के लागणारा व्याजदर या पडीच्या काळात कारखानदारांना न परवडण्यासारखा आहे असे माजी आमदार, घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी लोकमशी बोलताना सांगितले.गेल्या वर्षी केंद्र शासनाने दिलेले बिनव्याजी कर्ज अनुदान म्हणून घोषित करावे, साखरेचे दर कमी झाल्याने एफआरपी देण्यासाठी टनाला ५०० रूपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या हातात द्यावे आणि ५० लाख टन साखर निर्यातीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला तरच साखर कारखादारी वाचणार आहे. - पुरुषोत्तम जगताप (अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना)केंद्राने मदत केली तरच शेतकरी वाचणार आहे. साखरेला हमीभाव दिला तरच हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. तसेच झाले तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील आणि आंदोलने करण्याची गरज भासणार नाही. - संतोष कोंढाळकर , प्रगतशील, शेतकरीसाखर कारखानदारी प्रचंड आर्थिक संकटात सापडली असल्याने एफआरपीप्रमाणे उसाला दर देणे अशक्य आहे. मात्र, सरकारने साखर कारखान्यांना प्रत्येक टनामागे ५०० रुपये अनुदान दिल्यास ते शक्य होईल, - हर्षवर्धन पाटील