शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात ख्रिसमस, न्यू ईयर पार्ट्यांवर नजर

By admin | Updated: December 23, 2016 00:39 IST

लोणावळ्यात ख्रिसमस व न्यू इयरच्या पार्टीकरिता राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटकांचे शहरात

लोणावळा : लोणावळ्यात ख्रिसमस व न्यू इयरच्या पार्टीकरिता राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटकांचे शहरात स्वागत आहे. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्या तळीरामांवर प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करणार आहे, अश्ी माहिती शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली. हुल्लडबाजांचा अड्डा अशी ओळख बनलेल्या लायन्स पॉइंटवर सायंकाळी सातनंतर पर्यटकांना बंदी करण्यात येणार असून, परिसरात कोणी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.जाधव म्हणाले, ‘‘काही पर्यटक नशेत बेदरकारपणे वाहने चालवितात. काही धांगडधिंगा करुन सार्वजनिक शांतता भंग करतात. महिलांची छेडछाड, वाहतूक नियमांचा भंग करत वेगात वाहने चालविणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे अशा तळीरामांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासह खासगी बंगले, फार्म हाऊसमध्ये रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या यांच्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. ख्रिसमस व न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र हाय अलर्ट असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याकरिता पोलीस निरीक्षक जाधव यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी नगरसेवक श्रीधर पुजारी, नितीन आगरवाल, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मजहर काँट्रॅक्टर, प्रा. डॉ. जिभाऊ बच्छाव, राजेश आगरवाल, शिला बनकर, यमुना साळवे, विजय शेवाळे आदी उपस्थित होते.(वार्ताहर)