शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

लोणीकंदला ‘दादां’चेच वर्चस्व!

By admin | Updated: December 29, 2016 03:11 IST

जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या लोणीकंद ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर ग्रामविकास पॅनलने

लोणीकंद : जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या लोणीकंद ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर ग्रामविकास पॅनलने १७ पैकी १४ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झालेले प्रदीप कंद, शंकरकाका भूमकर, संदीप भोंडवे व श्रीमंत झुरुंगे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी विचार मंच पॅनलला फक्त वार्ड नं ५ मध्ये यश आले असून तेथील ३ जागा कशाबशा पदरात पडल्या. मात्र त्यांच्या आईचा पराभव झाला. भूमकर यांच्या घरातीलही दोघांना पराभवला सामोरे जावे लागले. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात निवडणूक निर्णय अधिकारी महेश वाघमारे यांनी निवडणूक मतमोजणी निकाल घोषणा केली. या वेळी घोषणेचा विवाद आणि गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पोलिसांनी मिरवणुकीला विरोध केल्याने सभा घेण्यात आली. निकालानंतर ‘लोकमत’शी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी कोणी आपला शत्रू नसल्याचे सांगत ही विचारांची लढाई आहे. आमचे ध्येय हे वाड्या वस्त्यांचा व गावाचा विकास करणे हे आहे. तर प्रदीपभाऊ कंद यांनी ही चुरशीची लढाई झाली. मी माझा गड राखला आहे. इतर वार्डात आमच्या उमेदवारांनी २५ व काही ठिकाणी ५0 मते कमी पडल्याने त्यांचा पराभव झाल्याचे सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी महेश वाघमारे यांनी प्रत्येक वॉर्डची स्वतंत्र मतमोजणी केली. या वेळी त्याच वॉर्डातील फक्त उमेदवार अथवा प्रतिनिधी यांनाच प्रवेश होता. एक वॉर्ड संपला, की दुसरा वॉर्ड अशा क्रमाने मतमोजणी झाली नाही. निवडणूक निकालानंतर ‘एकच वादा प्रदीपदादा’ या घोषणेने आसमान दणाणून गेले. ढोल-ताशा निनाद व गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी श्री म्हसोबा देवस्थानचे प्रारंभी दर्शन घेतले. प्रदीप कंद यांची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांनी व्यूहरचना केली होती. सर्व वॉर्डात ताकद लावली होती. पण त्यांना ग्रामस्थांनी साथ दिली. (वार्ताहर)विजयी उमेदवार : सोमेश्वर : रामदास बबन ढगे, योगेश बाजीराव झुरुंगे, संगीता दिनेश शिंदे, शीतल ज्ञानेश्वर कंद, मंदा ज्ञानेश्वर कंद, संतोष अंकुश लोखंडे. सुरेखा किरण घोले, सोहम बाळासाहेब शिंदे, आशा विष्णू खलसे, शैलजा ज्ञानेश्वर कंद, सागर तुकाराम गायकवाड, जयश्री गणेश झुरुंगे, रवींद्र नारायण कंद, अश्विनी संतोष झुरुंगे. स्वाभिमानी : रूपेश शिवाजी गावडे, सागर दत्तात्रय झुरुंगे, भाग्यश्री रूपेश कंद.