शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

लोणावळ्यात संततधार

By admin | Updated: August 12, 2016 01:01 IST

लोणावळा, खंडाळा या घाटमाथ्यावरील पर्यटनस्थळांसह मावळ तालुक्यात पावसाचा जोर गुरुवारी सकाळपासून पुन्हा वाढला आहे.

लोणावळा : लोणावळा, खंडाळा या घाटमाथ्यावरील पर्यटनस्थळांसह मावळ तालुक्यात पावसाचा जोर गुरुवारी सकाळपासून पुन्हा वाढला आहे. काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने मावळातील पवना, वडिवळे, आंद्रा, भुशी, तुंगार्ली, लोणावळा आदी सर्वच धरणे पूर्ण भरली आहेत. टाटा कंपनीच्या वलवण, शिरोता, सोमवडी, ठोकळवाडी या धरणांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरल्याने धरणाच्या हायड्रो व दरवाजांवाटे दुपारी १ वाजल्यापासून २७९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याने पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून लोणावळ्यात सरीवर पडत असणाऱ्या पावसाचा जोर सकाळपासून वाढला आहे. पावसाची संततधार सुरू राहिल्यास व पुन्हा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनाकडून पुन्हा येणाऱ्या शनिवार, रविवार व सोमवारी लोणावळ्यातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्याची शक्यता असल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लोणावळा आणि खंडाळा परिसरात मागील दोन आठवड्यांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात या वर्षी ११ आॅगस्ट अखेरपर्यंत ३२५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या कालावधीपर्यंत २५१५ मिमी पावसाची नोंद झाली होती. गतवर्षी वर्षाअखेर ३३४९ मिमी पावसाची नोंद झाली होती. गतवर्षीची सरासरी ओलांडायला केवळ ९८ मिमी पावसाची गरज आहे.(वार्ताहर)