शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आयोजित ‘पुणे प्रॉपर्टी शोेकेस २०१७’

By admin | Updated: March 22, 2017 03:02 IST

पुण्यातील रिअल इस्टेट मार्केटमधील बुम सुरूच असून गुंतवणुकीला चांगला परतावा देणाऱ्या मोजक्या शहरांत पुण्याचा समावेश होतो.

पुणे : पुण्यातील रिअल इस्टेट मार्केटमधील बुम सुरूच असून गुंतवणुकीला चांगला परतावा देणाऱ्या मोजक्या शहरांत पुण्याचा समावेश होतो. त्यामुळे ‘पुण्यातील घर’ हे स्वप्न साकारतानाच गुंतवणुकीची चांगली संधी म्हणून पुण्यातील गृहनिर्माण क्षेत्राला इतर शहरांतूनही पसंती मिळत आहे. गेल्या पाच वर्षांपासून लोकमत ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांचे प्रदर्शनाचे आयोजन औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर येथे करते. यंदाचे या उपक्रमाचे हे यशस्वी सहावे वर्ष असून येत्या शनिवारी(दि़ २५) व रविवारी (दि. २६) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत गणेश कला, क्रीडा मंच, स्वारगेट पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे १५० हून अधिक गृहप्रकल्प यात पाहता येणार आहेत. या प्रदर्शनास बँकिंग पार्टनर बँक आॅफ महाराष्ट्र आहे. या गृहप्रदर्शनात अ‍ॅफोर्डेबल होम्स, लक्झुरियस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, रो-हाऊस, बंगलो प्लॉटस्, ओपन प्लॉटस् असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय या वेळी पुणेकरांना पाहता येणार आहेत़ पुणे, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्यामुळे या प्रदर्शनामध्ये वेळ व पैशाची बचत होणार आहे़ आपल्या स्वप्नातील व आपल्या गरजेप्रमाणे हवे असणारे मनपसंत घर येथे इच्छुक ग्राहकांना पाहता येणार आहेत़ या प्रदर्शनासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक योजना आखल्या आहेत़ त्यांचाही लाभ या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना मिळणार आहे़ गेल्या ५ वर्षांमध्ये पुण्यातील अनेक इच्छुकांनी आपले पुण्यातील घर नक्की करत, हे प्रदर्शन यशस्वी केले आहे. या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गणेश कला, क्रीडा मंचसारख्या पुण्यातील सर्व भागांतून सहजतेने पोहोचू शकणाऱ्या मध्यवर्ती ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. आवाक्यात आलेल्या गृहकर्ज व्याजदरांमुळे आगामी काळात पुणे बांधकाम क्षेत्राचे चित्र आणखी वेगाने बदलेल, असा अंदाज व्यक्त होतो आहे. अक्षयतृतीया, गुढीपाडवा सणांच्या पार्श्वभूमीवर आताची घर खरेदीची नामी संधी आहे. (प्रतिनिधी)