शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे जुळला पुन्हा संसार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:33 IST

पुणे: दोघांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले... दोघांचेही हे दुसरे लग्न होतं... तो व्यवसायाने ‘बिझनेसमन’... पण त्याचे आॅफिसमधल्या मुलीशी अफेअर ...

पुणे: दोघांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले... दोघांचेही हे दुसरे लग्न होतं... तो व्यवसायाने ‘बिझनेसमन’... पण त्याचे आॅफिसमधल्या मुलीशी अफेअर असल्याचा तिचा संशय होता. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि या दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाले. लॉकडाऊनकाळात ती भावाकडे राहात होती. त्यावेळी तिला जाणीव झाली की शेवटी आपले घर हे आपलेच असते. तिने त्याच्याबरोबर नांदण्याची तयारी दर्शविली आणि त्यानेही ‘या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव खुले आहेत,’ असे म्हणत प्रतिसाद दिला अन‌् कोरोना लॉकडाऊनमुळे दोघांचा संसार नव्याने फुलला.

राहुल आणि अंजली (नावे बदलली आहेत) या दोघांची कहाणी ‘हटके’ अशी आहे. एकाच समाजातील असल्यामुळे दोघांनी पाच वर्षांपूर्वी लग्न केले. त्याला तीन मोठी मुले आहेत. तो बिझनेसमन असल्याने त्याच्याच आॅफिसमध्ये असलेल्या मुलीशी त्याचे अफेअर आहे, असा तिचा संशय होता. तिने त्याचे काहीही न ऐकून घेता रागाच्या भरात घर सोडले. त्याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली. त्याची तिच्याबरोबर नांदायची इच्छा होती. मात्र तिच्या संशयखोर स्वभावामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी २०१९ मध्ये सामंजस्याने घटस्फोटासाठीचा दावा अॅड. अमित राठी यांच्यामार्फत न्यायालयात दाखल केला. एप्रिल २०२० मध्ये त्यांच्या घटस्फोट अर्जावर सुनावणी होऊन आदेश दिला जाणार होता. पण मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामध्ये दोघांची मने एकमेकांकडे वळली. दोघांनी संपर्क साधून एकत्र राहाण्याचा विचार केला. त्यामुळे घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला.

-------------------

आॅफिसमधल्या मुलीने बिझनेस स्थिरस्थावर करण्यास खूप मदत केली आहे. त्यामुळे मी तिला कामावरून काढून टाकू शकत नाही. ती मला मुलीसारखी आहे असे सांगून त्याने तिचा संशय दूर केला. लॉकडाऊनच्या काळात घटस्फोटाच्या मार्गावर असलेले असलेले हे जोडपे पुन्हा एकत्र आले.

- अॅड. अमित राठी

-------------