शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST

पुणे : बिबवेवाडी परिसरात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश ...

पुणे : बिबवेवाडी परिसरात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.

अमन संजय दिवेकर (वय २०, रा. खडके वस्ती, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गेल्या ३ वर्षांत जीवघेणी हत्यारे बाळगून खुनाचा प्रयत्न करणे, जबरी दुखापत, दंगा, बलात्कार, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे असे गंभीर ४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार देण्यास धजावत नव्हते.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस आयुक्तांना सादर केला. अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार शुक्रवारी अमन दिवेकर याला ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पुणे शहरात दहशत निर्माण करणा-या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अवलंबिले आहे. त्यानुसार मागील वर्षांमध्ये ११ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले होते. नव्या वर्षात ३ सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी दिली.