शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दहशत पसरविणार्‍या गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST

पुणे : मंगळवार पेठेत दहशत पसरविणार्‍या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. ...

पुणे : मंगळवार पेठेत दहशत पसरविणार्‍या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. परेश उदय मेहता (वय २२, रा. लक्ष्मीनारायण सोसायटी, मंगळवार पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

मेहता याने त्याच्या साथीदारांसह फरासखाना व चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, लोखंडी रॉड, लोखंडी साखळी, सुरा या हत्याराने खून, मारहाण, दंगा, बेकायदा शस्त्र बाळगणे यांसारखे गुन्हे केले आहेत. मागील ६ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यास नागरिक धजावत नव्हते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी एमपीडीए कायद्यान्वये परेश मेहता याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस आयुक्तांना सादर केला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्याला एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

२१ गुन्हेगारांवर कारवाई

पोलीस आयुक्त गुप्ता यांनी ८ महिन्यांत शहरात दहशत निर्माण करणार्‍या २१ अट्टल गुन्हेगारांना स्थानबद्ध करून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.