शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दुर्दशेकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST

रस्त्याच्या रुंदीकरणाच्या व नूतनिकरणाच्या माध्यमातून ज्या त्या परिसरातील विकासाच्या गतीला चालना मिळावी व दळणवळण सहज सोपेपणाने करता यावे हा ...

रस्त्याच्या रुंदीकरणाच्या व नूतनिकरणाच्या माध्यमातून ज्या त्या परिसरातील विकासाच्या गतीला चालना मिळावी व दळणवळण सहज सोपेपणाने करता यावे हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवला जातो.केंद्र सरकारच्या माध्यमातुन ज्या रस्त्यांना महामागार्ची मंजुरी मिळाली आहे त्या रस्त्यावरून जाणाºया वाहनांची वर्दळ साहजीकच वाढताना आढळून येते मात्र दौंड तालुक्यातील परिस्थिती त्याला अपवाद आहे.कुरकुंभ येथील औद्योगीक क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने होणारी कामगारांची वाहतूक तसेच विविध प्रकारच्या अवजड वाहतुकीला यामुळे धोका निर्माण झाला आहे.

दौंड तालुक्यात मुख्यत्वे दौंड पाटस,कुरकुंभ दौंड व सिद्धटेक दौंड या रस्त्यांची अवस्था अतिशयखराब झालेली आहे.त्यामुळे या रस्त्याचा वापर जितका शक्य होईल तितका टाळण्याचा प्रयत्न वाहतुकदार व स्थानीक नागरिक करताना दिसून येतात. अतिशय गाजावाजा करून रस्त्यांच्या कामाला झालेली सुरवात नंतरच्या काळात अनेक अडचणीत सापडत गेली. खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व तत्सम अधिकाºयांच्या बैठकीत देखील यावर तोडगा निघाला नसल्याने अपुºया यंत्रणेच्या व ढिसाळ कारभाराच्या गुºहाळात सर्वसामान्य जनता मात्र पिरगळून गेली आहे.

* उदासिन धोरणाचा फटका

कुरकुंभ येथे रस्त्याच्या कामातील संथ गतीने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आलेला असून स्थानिक प्रशासन व राजकीय नेतृत्वाच्या उदासीन धोरणाचा फटका सर्वसामान्य नागरीक, औद्योगीक क्षेत्रातील कामगार, प्रवाशी वाहतूक, अवजड वाहतूक, छोटे व्यापाºयांसह रस्त्याचा वापर करणाºया प्रत्येकाला करावा लागत आहे.

- जयश्री भागवत

माजी सरपंच कुरकुंभ

* महामार्ग प्रशासनाकडे मागणी

रस्त्याच्या कामातील दिरंगाईबाबत अनेकवेळा विविध अधिकाºयांना पत्रव्यवहार केलेला आहे. कुरकुंभ मुख्य रस्त्यामध्ये असणारे दुभाजक, विजेचे खांब,पादचारी मार्ग, भूमिगत गटारे लवकर पूर्ण करून देण्याबाबत महामार्ग प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

- राहुल भोसले

सरपंच कुरकुंभ

फोटो ओळ : कुरकुंभ येथे अतिशयथोड्या थोडक्या कामाने पादचारी मार्ग करण्यात येत आहे.कुरकुंभ बाजारतळ येथील सुरू असलेले काम.

0४१२२0२0-दौंड-११

-----------------