शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

साहित्य संमेलनातून प्रकाशकांना बगल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 03:21 IST

अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनानंतर दरवर्षी एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सत्कार केला जातो. मात्र, महामंडळ नागपूरला गेल्यानंतर या प्रथेला काही प्रमाणात बगल देण्यात आली आहे. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनापासून प्रकाशकाऐवजी प्रकाशन व्यवसायाशी संबंधित व्यक्तीचा सन्मान केला जात आहे.

पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनानंतर दरवर्षी एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सत्कार केला जातो. मात्र, महामंडळ नागपूरला गेल्यानंतर या प्रथेला काही प्रमाणात बगल देण्यात आली आहे. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनापासून प्रकाशकाऐवजी प्रकाशन व्यवसायाशी संबंधित व्यक्तीचा सन्मान केला जात आहे. महामंडळाची प्रकाशकांबाबतची भूमिका उदासीन झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रंथप्रदर्शनाची जबाबदारी महामंडळाऐवजी प्रकाशकांनी उचलण्याच्या सूचनेचे यंदा काय होणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.प्रकाशन व्यवसाय हा साहित्य व्यवहाराचा अविभाज्य भाग असल्याने साहित्य संमेलनांमध्ये प्रकाशकांना दर वर्षी सामावून घेतले जाते. केवळ संमेलनांपुरतेच नव्हे; तर वर्षभर प्रकाशन वाङ्मयीन व्यवहाराशी संबंधित असतात. साहित्य संमेलनांमध्ये ग्रंथविक्रीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते, वाचनसंस्कृती जोपासली जाते. साहित्यिक आणि प्रकाशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संमेलनामध्ये एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सन्मान करण्याची परंपरा चालत आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रकाशकांना या परंपरेतून डावलले जात असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे.दोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुण्यातून नागपूरला गेले. त्यानंतर डोंबिवलीतील संमेलनात लेखक म्हणून डॉ. जयंत नारळीकर यांचा सन्मान करण्यात आला. प्रकाशकाऐवजी प्रकाशनाशी संबंधित चेहरा अशी ओळख असलेले मुखपृष्ठाची दखल घेण्याच्या दृष्टीने बाळ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. बडोदा येथे होत असलेल्या आगामी ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये लेखक श्याम मनोहर यांचा, तर संपादक गंगाधर पानतावणे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाही प्रकाशक सन्मानापासून दूर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शनाचा वाटा मोलाचा असतो. प्रदर्शनाच्या निमित्ताने वाचक संमेलनाला हजेरी लावतात, पुस्तकांशी त्यांचा संबंध येतो. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथविक्री घटली होती. त्या वेळी ग्रंथप्रदर्शन हे केवळ विक्रीसाठी नसते, वाचकांनी येऊन पुस्तके पाहावीत, हा त्यामागचा हेतू असतो, असे मत महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले होते.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशकांचा सन्मान केला जातो. महामंडळाच्या सभेमध्ये हा विषय चर्चिला जाणे आवश्यक आहे. महामंडळात एखादी व्यक्ती स्वत:चा अजेंडा राबवणार असेल तर ते योग्य नाही. प्रकाशक हा साहित्यिकाशी सर्वांत जवळचा घटक आहे. प्रकाशक वर्षभर वाङ्मयीन व्यवहारात सहभागी होतात. शासनातर्फेही दर वर्षी प्रकाशकांना गौरवले जाते. महामंडळाने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेत बदल करू नये, असे वाटते.- अरुण जाखडे, प्रकाशकघुमानच्या संमेलनात मराठी वाचकच संमेलनाला येणार नसेल, तर पुस्तकांची विक्री कशी होणार, या मुद्द्यावरून प्रकाशकांनी संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता.कालांतराने तो रद्द करण्यात आला. आगामी संमेलन बडोद्याला होत असताना प्रकाशकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :marathiमराठी