शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रांची यादी गायब

By admin | Updated: October 7, 2014 06:57 IST

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त २०४ मावळ, २०७ भोसरी व २०८ वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची यादी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

पिंपरी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्रांच्या यादीतील जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त २०४ मावळ, २०७ भोसरी व २०८ वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची यादी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विधानसभा निवडणूक आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना अखेरच्या टप्प्यात नोंदणी केलेल्याची पुरवणी मतदार यादीही उपलब्ध झालेली नाही. सर्वसामान्य मतदारांना व कार्यकर्त्यांना मतदान केंद्राबाबत अचूक माहिती मिळत नसल्याने संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही . जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांचा संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रम गेल्या तीन महिन्यात राबविला होता. जून महिन्यापासून मतदारयादीत दुरुस्ती मोहीम सुरु केली होती. या मोहिमेत नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच विधानसभा निवडणूक बारा सप्टेंबरला जाहीर झाल्यानंतर सत्तावीस सप्टेंबरअखेर मतदार यादीत नाव नोंदणीची अखेरची संधी दिली होती. मात्र आजतागायत ( सोमवार ) संकेतस्थळावर पुरवणी मतदार यादीही उपलब्ध झालेली नाही, असे नवीन नाव नोंदणी केलेल्या मावळ व चिंचवड मतदारसंघांतील अनेक नव मतदारांनी सांगितले. (वार्ताहर )