वासुंदे : हिंगणीगाडा (ता. दौंड) येथे काही महिन्यांपासून सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा संतप्त ग्रामस्थांनी उद्ध्वस्त केला. मालवणी येथे गावठी दारूच्या प्राशनाने १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अवैध व गावठी दारूचे धंदे उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, हिंगणीगाडा गावाच्या सीमेवर काही महिन्यांपासून सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा आजतागायत खुलेआम सुरू असल्याने या दारूच्या आहारी जाऊन तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले होते. यामध्ये नव्याने बांधकाम केलेल्या घराचे नुकसान करून बॅरल, खाटा व इतर साहित्य जाळून टाकले. या संदर्भात यवत पोलिसांकडे कुठलीही नोंद नसल्याचे समजते. (वार्ताहर)
दारूचा अड्डा ग्रामस्थांकडून उद्ध्वस्त
By admin | Updated: July 2, 2015 23:50 IST