शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चाची मर्यादा १० लाख

By admin | Updated: February 1, 2017 05:06 IST

महापालिका निवडणुकीसाठी एका इच्छुक उमेदवाराला खर्च करण्यासाठी ५ लाखांच्या मर्यादेमध्ये दुपटीने वाढ करून ती १० लाखइतकी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी एका इच्छुक उमेदवाराला खर्च करण्यासाठी ५ लाखांच्या मर्यादेमध्ये दुपटीने वाढ करून ती १० लाखइतकी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी काढण्यात आले आहेत. त्यामुळे अवघ्या ५ लाखांत निवडणुकीचा हिशेब कसा दाखवायचा, याच्या चिंतेत असलेल्या इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर करून निवडणुकीवर प्रभाव पाडू नये, यासाठी निवडणूक आयोगाकडून उमेदवारांनी निवडणुकीमध्ये करावयाच्या खर्चावर मर्यादा घातली जाते. राज्यातील आगामी दहा महापालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या, त्या वेळी उमेदवारांना खर्च करण्यासाठी ५ लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर इतक्या खर्चात निवडणूक लढविणे अवघड असल्याने त्यामध्ये दुपटीने वाढ करून ती १० लाखइतकी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे.राज्य निवडणूक आयोगाकडून १५० ते १६१ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकांच्या उमेदवारांसाठी १० लाखइतकी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. ११६ ते १५० सदस्यसंख्या असलेल्या महापालिकांसाठी ८ लाखांपर्यंत, ८६ ते ११५ सदस्यसंख्येच्या महापालिकांसाठी ७ लाख, ६५ ते ८५ सदस्यसंख्या असलेल्या पालिकांसाठी ५ लाख इतकी उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदांसाठी ४ लाख ते ६ लाख, तर पंचायत समित्यांसाठी ३ ते ४ लाख इतकी उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. - उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर मतदान होईपर्यंत त्याच्याकडून निवडणुकीसाठी केला जाणारा खर्च मोजला जातो. निवडणुकीसाठी दररोज केल्या जाणाऱ्या खर्चाची माहिती त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागते. उमेदवारांना घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा त्यांना जास्तीचा खर्च करता येत नाही, तसे आढळून आल्यास त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते.