शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

ग्रामीण जीवनातील प्रश्नांवर प्रकाश

By admin | Updated: January 9, 2017 03:23 IST

खेडोपाड्यात काम करताना भेटलेली माणसे, त्यांचे प्रश्न, जातीयता, स्त्रीची लैंगिकता, आदिवासींचे जीवन, समाजजीवनातील

 पुणे : खेडोपाड्यात काम करताना भेटलेली माणसे, त्यांचे प्रश्न, जातीयता, स्त्रीची लैंगिकता, आदिवासींचे जीवन, समाजजीवनातील वास्तवाचा मागोवा घेणाऱ्या एकांकिकांचे विषय या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकत आपल्या कार्याची खऱ्या अर्थाने ओळख करून देत खेडोपाड्यातील जीवनावर व त्यांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे काम पुरस्कारार्थींनी केलं.निमित्त होतं महाराष्ट्र फाउंडेशनने पुरस्कार देऊन गौरविलेल्यांच्या गप्पांच्या कार्यक्रमाचे. कार्यकर्ता पुरस्कार मिळालेले देवाजी तोफा, विजय दिवाण, सुशीला नाईक, विशेष ग्रंथ पुरस्कार मिळालेले अरुण जाखडे, ललित ग्रंथ पुरस्कार मिळालेल्या अंजली जोशी, रा. शं. नाट्य पुरस्कार मिळालेले अनिलकुमार साळवे यांनी बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात पुणेकरांशी संवाद साधत कार्याची माहिती करून दिली.अनिलकुमार साळवे म्हणाले, ‘‘गवंडीकाम करत अगदी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. मी बीडचा रहिवासी, येथील भयानकता, येथील लोकांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा या नेहमीच मला अस्वस्थ करायच्या. या सर्व व्यथा मी लोकांसमोर मांडण्यासाठी एकांकिका हे माध्यम निवडले. ग्लोबल आडगाव, शेख मोहम्मद : मराठी माध्यम, तिच्यासाठी वाट्टेल ते या एकांकिकांमधून विविध विषयांना हात घातला. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर नाट्यप्रयोग होतात. मात्र, त्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही.’’बेळगावतील निपाणी गावात देवदासी प्रथेतून महिलांची सुटका करण्यासाठी संघर्ष केलेल्या सुशीला नाईक यांनी या भागातील देवदासी स्त्रियांची कैफियत मनोगतातून व्यक्त केली. तसेच त्या करत असलेल्या सामाजिक कामात आलेल्या अडचणी, लोकांनी केलेला विरोध यांचे कथन केले. तसेच त्या करत असलेल्या कार्याचीही माहिती दिली. अंजली जोशी, विजय दिवाण, अरुण जाखडे यांनीही मनोगत व्यक्त केले.