शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पावसाच्या हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम रविवारी रात्रीपर्यंत पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर जाणवत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम रविवारी रात्रीपर्यंत पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर जाणवत होता. त्यानंतर सोमवार सकाळपासून जोराने वाहणार्‍या वार्‍यांचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे. शहरात दिवसभरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत होत्या.

सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ८.२ मिमी, लोहगाव येथे ६.२ मिमी आणि पाषाण येथे ९.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. रविवारी दिवसभरात ताशी ३५ ते ४० किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे शहरातील सर्वच भागात झाडे पडण्याच्या घटना घडल्या. रविवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ४० झाडे पडली. त्यानंतर रात्रभरात आणखी १४ ठिकाणी झाडे पडल्याची वर्दी अग्निशमन दलाकडे आली होती.

कात्रज येथील हॉटेल तिरंगा, सोन्या मारुती चौक, धनकवडी, सोमवार पेठ, एनआयबीएम रोड, कोरेगाव पार्क, दत्तवाडी पोलीस चौकीसमोर, लॉ कॉलेज रोडवरील दामले पथ, हडपसर औद्योगिक वसाहत, सेनापती बापट रोडवरील जे. डब्ल्यु मेरियट, बी टी कवडे रोड, गणेश खिंड रोड, टिंबर मार्केट याठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्या.

सोमवारी सकाळपासून वार्‍याचा वेग कमी होत गेला. सकाळी काही वेळ पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. दुपारनंतर वार्‍याचा वेगही ताशी ३० किमीपेक्षा कमी झाला. आकाश मात्र दिवसभर ढगाळ होते. पुणे शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगरला ३ मिमी तर लोहगाव येथे ०.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. आशय मेजरमेंटनुसार सोमवारी साडेसात वाजेपर्यंत कात्रज ५.४, वारजे १२, खडकवासला ८, कोथरुड ५.८, लोणी काळभोर ०.४, मोहोळ सोलापूर ०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज वाऱ्याचा वेग ताशी २५ ते ३२ किमी इतका आहे.

मंगळवारी शहरात आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

फोटो - ट्री कटिंग नावाने आहे.