शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या पैशातून खासगी सोसायट्यांमध्ये ‘उजेड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2015 00:46 IST

महापालिकेच्या निधीतून खासगी सोसायट्यांच्या आवारात उजेड पाडण्याचा धक्कादायक प्रकार वडगावशेरी परिसरात समोर आला आहे.

पुणे : महापालिकेच्या निधीतून खासगी सोसायट्यांच्या आवारात उजेड पाडण्याचा धक्कादायक प्रकार वडगावशेरी परिसरात समोर आला आहे. यासाठी महापालिकेच्या पथदिव्यांची दिशाच बदलण्यात आली आहे. वडगावशेरी येथील प्रभाग १८मध्ये वृंदावननगर भागातील रस्त्यावर चक्क खासगी सोसायट्यांच्या आवारात विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत. याची तक्रार करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याला धमक्याही देण्यात येत आहेत. या दिव्यांची प्रकाशाची बाजू सोसायट्यांच्या आवाराच्या दिशेने करण्यात आली आहे. येथील विशाल हाईट्स, विशाल व्हिजन, विशाल व्हिव, सिटी रेसिडन्सी, वेलवर्थ क्लासिक अशा पाच सोसायट्यांमध्ये प्रत्येकी दोन दिवे असलेले खांब उभे केलेले आहेत. वडगावशेरी नागरी मंचाच्या वतीने आशिष माने यांनी याबाबत नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करून या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)अशा प्रकारे खासगी सोसायट्यांमध्ये पथदिवे बसविता येत नाहीत. असा प्रकार घडला असल्यास क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. - विजय दहिभाते, उपायुक्त विद्युत विभागसोसायट्यांमध्ये बसविण्यात आलेले दिवे हे स्वत:च्या पैशातून बसविण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या निधीचा वापर केलेला नाही. - सुनीता गलांडे, स्थानिक नगरसेविका४महापालिकेच्या निधीतून कोणत्याही खासगी सोसायट्यांमध्ये कामे करता येत नाहीत. ही बाब माहिती असतानाही नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, त्याबाबत माने यांनी तक्रारही केली आहे. मात्र, त्या तक्रारीची दखल अद्यापही क्षेत्रीय कार्यालयाकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिका कोणाच्या हितासाठी काम करते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.