शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स

By admin | Updated: December 19, 2014 15:30 IST

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर ही स्पर्धा सुरू आहे. १० मीटर एअर पिस्टल प्रकारातील विविध गटांमध्ये पदक

पुणे : राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आज कर्नाटकच्या पी. एन. प्रकाश याने चॅम्पियन्स आॅफ चॅम्पियन्सचा किताब पटकावला. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या साताऱ्याच्या शीतल थोरात हिने सुवर्णवेध घेत दिवस गाजवला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर ही स्पर्धा सुरू आहे. १० मीटर एअर पिस्टल प्रकारातील विविध गटांमध्ये पदक जिंकणाऱ्यांपैकी ८ अव्वल खेळाडूंमध्ये ‘चॅम्पियन्स आॅफ चॅम्पियन्स ही स्पर्धा घेण्यात आली. यात प्रकाशने अंतिम फेरीत १०.१, ९.९ आणि १०.५ अशी ३०.५ गुणांची कमाई करीत बाजी मारली. उत्तराखंडच्या प्रेरणा गुप्ताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिने २८.१ गुणांचा (८.५, ९.४ आणि १०.२) स्कोअर केला. प्रकाशला ५० हजार, तर प्रेरणाला १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत जीतू रॉय, समरेश जंग, शीतल थोरात, एस. रिझवी, प्रशांत नागरे आणि विपीन राणा हेदेखील सहभागी झाले होते. महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये १९९ गुण पटकावणारी शीतल अव्वल ठरली. पंजाबच्या हरवीन साहू (१९७.३) हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रेरणा गुप्ताने (१७३.९) कांस्यपदक मिळवले. याच प्रकारातील सांघिक गटामध्ये महाराष्ट्राचे सुवर्ण ५ गुणांनी हुकले. सीआरपीएफने ११२२ गुण घेत अव्वल स्थान पटकावले. रौप्यपदकविजेत्या महाराष्ट्राने १११७ गुणांची कमाई केली. या संघात राही सरनोबत (३७५), श्रेया गावंडे (३७३) आणि मनीषा राठोड (३६९) यांचा समावेश होता. हरियानाच्या वाट्याला कांस्यपदक आले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय रायफल संघटनेचे सचिव डी. व्ही. सीताराम यांच्या हस्ते झाले. या वेळी स्पर्धा संयोजन समितीच्या प्रमुख शीला कानुगो आणि सचिव अशोक पंडित उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)