शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

उपसा बंद

By admin | Updated: April 21, 2016 01:14 IST

पुणे, अहमदनगर, सोलापूर व बीड या जिल्ह्यातील दुष्काळी भागात सोडण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे आवर्तन कुकडी डावा कालव्याद्वारे ११४ किमीपर्यंत पोहोचले आहे.

नारायणगाव : पुणे, अहमदनगर, सोलापूर व बीड या जिल्ह्यातील दुष्काळी भागात सोडण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे आवर्तन कुकडी डावा कालव्याद्वारे ११४ किमीपर्यंत पोहोचले आहे. पाण्याचे आवर्तन सुरळीत व्हावे व पाणी पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी कुकडी कालव्यावरील ३८० उपसा सिंचन मोटारी काढण्यात आल्या आहेत़ कोणीही कालव्याची तुटफूट केली किंवा कालव्यावरून अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता जी़ बी़ नन्नोर यांनी दिली़ कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी डावा कालव्याद्वारे उन्हाळी पिण्याचे आवर्तन दि़ १६ एप्रिल पासून सोडण्यात आलेले आहे़ हे पाणी पुणे, अहमदनगर, सोलापूर व बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी सोडण्यात आलेले आहे़ ते पाणी ११४ कि़मी़वर पिंपळगाव वीसा गेटपर्यंत पोहोचले आहे़ पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कालव्यावरील गळती कमी करून उपसा सिंचन विद्युत मोटारी काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून, कालव्यावरील एकूण ३८० उपसा मोटारी काढण्यात आल्या आहेत़ नव्याने निदर्शनास येणाऱ्या मोटारी काढण्याचे काम व त्यावरील कारवाई महसूल विभाग, पोलीस व पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात येत आहे़ (वार्ताहर)कुकडी कालवा पिण्याचे आवर्तन सुरळीत होण्यासाठी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई विचारात घेऊन सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कालव्यातून अनधिकृत पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- जी. बी. नन्नोरे, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे