शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२१ तोळे सोन्याचे दागिने लंपास

By admin | Updated: July 15, 2016 00:29 IST

घरात कोणीही नसल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ‘बालाजी हाइट्स’ या गृहनिर्माण संस्थेतील फ्लॅटमधून ३ लाख ९९ हजार रुपये किमतीचे

लोणी काळभोर : घरात कोणीही नसल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ‘बालाजी हाइट्स’ या गृहनिर्माण संस्थेतील फ्लॅटमधून ३ लाख ९९ हजार रुपये किमतीचे २१ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना १३ जुलै रोजी भर दुपारी घडली. लोणी काळभोर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरीसंदर्भात शशिकांत चंद्रकांत साबळे (वय ५५ वर्षे, रा. बालाजी हाइट्स, फ्लॅट क्र. ७, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. साबळे हे वाघोली येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या सासूबाई पालखीसोबत पंढरपूरला गेल्या आहेत. त्यामुळे सासूबार्इंनी स्व:ताचे सोन्याचे दागिने साबळे यांच्या घरी आणून ठेवले होते. १३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता साबळे व त्यांची मुलगी कल्याणी हे कामाला निघून गेले होते. मुलगा अभिषेक हा ११ वाजता क्लासला व पत्नी संगीता या १२.३० वाजण्याच्या सुमारास हडपसरला दवाखान्यात गेल्या. संगीता यांनी जाताना फ्लॅटला कुलूप लावून कुलपाची चावी शेजारील एका घरात ठेवली होती. मुलगा अभिषेक दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घरी आला असता, त्याला फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्याने शेजारच्या फ्लॅटमध्ये विचारले असता त्यांनी कुणालाच चावी दिलेली नव्हती. त्याने सदर बाब तत्काळ बहिणीला, तर तिने वडिलांना कळविले. या घटनेत अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप बनावट चावीने उघडून व लोखंडी कपाटाचे कुलूप उचकटून त्यांत ठेवलेले १ लाख ९० हजार रुपये किमतीचे १० तोळे वजनाचे गंठण, २८ हजार ५०० रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे कानांतील टॉप्स, ९ हजार ५०० रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाचे कानांतील टॉप्स, १ लाख ७१ हजार रुपये किमतीचे ९ तोळे वजनाचे नेकलेस असे एकूण ३ लाख ९९ हजार रुपये किमतीचे २१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. यांव्यतिरिक्त या घटनेत साबळे यांची सासू अरुणा कदम यांनी वारीला जाताना ठेवलेले दागिनेही चोरट्यांनी लंपास केले असून, त्यांनी किती दागिने ठेवले होते याबद्दल साबळे यांना माहिती नसल्याने त्याची माहिती सासू वारीवरून परत आल्यानंतर ते देणार आहेत. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. या संदर्भात पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. बडवे पुढील तपास करीत आहेत.(वार्ताहर )