शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘चार’ गुणांसाठी आयुष्य संपविले...

By admin | Updated: June 1, 2017 03:56 IST

‘आई, बाबा सॉरी’ असे म्हणत, अवघ्या ‘चार’ गुणांमुळे बारावीत नापास झालेल्या विद्यार्थिनीने आयुष्यच संपविल्याची दु:खद घटना मंगळवारी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘आई, बाबा सॉरी’ असे म्हणत, अवघ्या ‘चार’ गुणांमुळे बारावीत नापास झालेल्या विद्यार्थिनीने आयुष्यच संपविल्याची दु:खद घटना मंगळवारी सायन परिसरात घडली. दीप्ती दीपक मोरे, असे तिचे नाव होते. तिला दहावीत ८६ टक्के मिळाले होते. बारावीत चार गुण कमी पडले म्हणून ती नापास झाली. याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. याप्रकरणी वडाळा टी.टी. पोलीस अधिक तपास करत आहेत.सायन येथील पंचशीलनगर झोपडपट्टीत दीप्ती आई, बाबा, भाऊ आणि बहिणीसोबत राहायची. बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही दीप्तीने अभ्यासावर अथक मेहनत घेऊन, दहावीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळविले. त्यानंतर तिने सिद्धार्थ कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. मात्र, अवघ्या चार गुणांमुळे ती नापास झाल्याचे तिला समजले. हे ऐकूण कुटुंबीयांसह तिलाही धक्का बसला. खरंतर तिला जास्त गुणांची अपेक्षा होती. नापास झाल्यामुळे तिने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ दीप्तीच्या खोलीतून आवाज येत नसल्याने कुटुंबीय तेथे गेले. त्या वेळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला सायन रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वडाळा टी.टी. पोलीस तेथे दाखल झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाइड नोटही ताब्यात घेतली आहे. त्यात, ‘नापास झाल्यामुळे आत्महत्या करत असून, यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये,’ असे तिने म्हटले आहे. शिवाय, ‘आई, बाबा सॉरी’ असेही नमूद केले आहे. हुशार, तसेच सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या दीप्तीने आत्महत्या केल्यामुळे मोरे कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनाही मोठा धक्का बसला आहे.