शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

‘लाटलेले’ पैैसे शिक्षक परत करेनात

By admin | Updated: June 29, 2017 03:35 IST

आंबेगाव तालुक्यातील ८२ शिक्षकांनी आदिवासी भागात राहत असल्याचा बनाव करत लाटलेले एकस्तरचे वेतन वसुलीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कतळेघर : आंबेगाव तालुक्यातील ८२ शिक्षकांनी आदिवासी भागात राहत असल्याचा बनाव करत लाटलेले एकस्तरचे वेतन वसुलीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, या आदेशाला संबंधित शिक्षकांकडून केराची टोपली दाखवली आहे. ‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडली होती. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात राहून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांना त्यांच्या कामामध्ये काम करताना प्रोत्साहन मिळावे म्हणून, शासनाने प्रोत्साहनपर भत्ता म्हणजेच एकस्तर वेतनश्रेणी लाभ देण्याचे ठरविले. मात्र शिक्षकांनी ग्रामसेवक, केंद्रप्रमुख यांना हाताशी धरून कामाच्या ठिकाणी राहत असल्याबाबतची खोटी प्रमाणपत्रे शासनाकडे सादर केली. या वेतनश्रेणीचा आर्थिक लाभ घेतला. या विषयाला ‘लोकमत’ने प्रथम वाचा फोडली. १ जून रोजी ‘एकस्तरचे वेतन लाटले’ असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. जिल्हा परिषद प्रशासनही या वृत्ताने जागे होत, शिक्षण अधिकारी (प्राथमिक) डॉ. मुश्ताक शेख यांनी आदेश काढून लाभ घेतलेल्या शिक्षकांचा व उर्वरित मागणी करणाऱ्या शिक्षकांचा सविस्तर अहवाल मागविला. याबाबतची सविस्तर चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी दाल्ौत देसाई व शेख यांनी गटशिक्षणाधिकारी यांना लेखी आदेश देऊन सर्व रक्कम वसूल करण्यास सांगितली. रक्कम न भरल्यास संबंधित शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु अजूनपर्यंत एकाही शिक्षकाने रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा न करता संबंधित शिक्षकांनी या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.आंबेगाव तालुक्यातील ८२ शिक्षकांनी आदिवासी भागात राहत असल्याचा बनाव करत शासनाचा प्रोत्साहनपर भत्ता म्हणजेच एकस्तर वेतनश्रेणी लाभ घेत शासनाचे १ कोटी ६२ लाख ५२ हजार ३०७ रुपये रक्कम घेतली आहे. ही रक्कम एकरकमी शासनाकडे पुन्हा जमा करावी व दिलेल्या मुदतीत रक्कम न भरल्याने वरिष्ठांनी आदेशाचे पालन न केल्याचे दिसून आल्याने आपणाविरुद्ध प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई करण्यार येणार असल्याचा असा आदेश आंबेगाव तालुका गटशिक्षणाधिकारी पोपट महाजन यांनी दिला. यावर संमंधित शिक्षकांनी कोणतेही कारण न सांगता एकरकमी परत शासनाला करणार असल्याचे हमीपत्र दिले आहे.