शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

दाखले मिळण्यासाठी तारांबळ

By admin | Updated: July 13, 2015 23:44 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रथमच आॅनलाईन अर्ज भरले जाणार असून, विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी सुविधा केंद्रात इच्छुकांनी गर्दी केली आहे.

मंचर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रथमच आॅनलाईन अर्ज भरले जाणार असून, विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी सुविधा केंद्रात इच्छुकांनी गर्दी केली आहे. कागदपत्रे गोळा करताना इच्छुकांची दमछाक होत असून, कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी माहीतगारांची मदत घेतली जात आहे.तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास आज सुरुवात झाली. आॅनलाईन पद्धत समजावून घेणे अनेकांना अवघड बनत आहे. यासाठी माहीतगाराची मदत त्यासाठी घेतली जात आहे. आॅनलाईन अर्ज भरताना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे फॉर्म भरण्याच्या पहिल्या दिवशी इच्छुक कागदपत्रे गोळा करताना दिसले. आरक्षित जागांवर निवडणूक लढवण्यासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.एका व्यक्तीची ही कागदपत्रे तयार करताना पंधरा ते वीस मिनिटे लागतात. सायंकाळपर्यंत नायब तहसीलदारांची सही होऊन कागदपत्रे इच्छुकांच्या हातात पडतात. कागदपत्रे हाती येईपर्यंत इच्छुक उमेदवार अनेकदा सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा करताना दिसतात. ग्रामपंचायत कार्यालयात थकबाकी नसल्याचा तसेच घरी स्वच्छतागृह असल्याचा दाखला घ्यावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय गजबजलेले असून ग्रामसेवकांनीसुद्धा इच्छुकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी बदल करण्याचा सपाटा लावला आहे. एरवी आढेवेढे घेणारे नागरिक निमूटपणे रक्कम काढून देत असल्याने या आठवडाभरात ग्रामपंचायतीचा महसूल वाढणार आहे. ग्रामपंचायतीच्या जागा कमी असल्या तरी इच्छुक जास्त आहेत. त्या सर्वांनी कागदपत्रांची तयारी केली आहे. आठ दिवस सुविधा केंद्रांत कामाचे वातावरण राहणार आहे.(वार्ताहर)ग्रामपंचायत निवडणुकीमुळे दाखले नेणारांची संख्या तिपटीने वाढली आहे. बहुतेक उमेदवारांना याबाबत फारशी माहिती नाही. तहसीलदार कार्यालयाने उमेदवारांना मार्गदर्शन केले पाहिजे. गरज लक्षात घेऊन वेळेवर कागदपत्रे देण्यासाठी जास्त वेळ सुविधा केंद्रात काम केले जाते.-शरदराव शिंदे, महा ई-सेवा केंद्र चालक