शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

ग्रंथपाल झाले ‘वॉचमन’

By admin | Updated: August 12, 2016 01:13 IST

ग्रंथचळवळ पुढे नेण्यासाठीचे ज्ञानसेतूचे काम करणाऱ्या ग्रंथपालांकडे शासनाने पाठ फिरविल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे

नम्रता फडणीस, पुणेग्रंथचळवळ पुढे नेण्यासाठीचे ज्ञानसेतूचे काम करणाऱ्या ग्रंथपालांकडे शासनाने पाठ फिरविल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ केले नसल्याने प्रपंच चालविण्यासाठी ‘वॉचमन’, ‘किराणा मालाच्या दुकानातील कामगार’, असा उपजीविकेचा पर्यायी मार्ग त्यांना शोधावा लागत आहे. एम.लिब. सायन्ससारखी व्यावसाईक मास्टर डिग्री असूनही ग्रंथपालांवर उपासमारीची वेळ आली आहे. भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांची १२५वी जयंती शुक्रवारी साजरी होत आहे. हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा होतो. या पार्श्वभूमीवर ग्रंथपालांच्या सद्यस्थितीविषयी पाहणी केली असता, शासनाच्या उदासीनतेमुळे हे पदच धोक्यात असल्याचे समोर आले आहे. तीस वर्षे काम करूनही अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ केलेले नाही. मुलांना पुस्तके घ्यायलादेखील त्याच्याकडे पैसे नाहीत. ४ हजार रुपयांच्या वेठबिगारावर हे ग्रंथपाल काम करीत आहेत. कुणी वॉचमन, कुणी रिक्षाचालकाचा व्यवसाय करीत आहे. पुुण्याच्या पूर्व भागातल्या प्रथितयश शाळेतील अर्धवेळच्या महिला ग्रंथपालावर पाळणाघरात काम करण्याची वेळ आली आहेपुणे जिल्हा ग्रंथपाल संघटनेचे सल्लागार सिद्धनाथ पवार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘‘माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा १६ हजार शाळांपैकी केवळ २० ते ३० टक्के शाळांमध्येच ग्रंथपाल आहेत. अनुदानित शाळांमध्ये हे पद रिक्तच आहे. १९७८ पर्यंत ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणीप्रमाणे वेतन मिळत होते, मात्र त्यानंतर हे बंद झाले. ग्रंथपालांनी न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने शासनाच्या विरोधात निर्णय दिल्यामुळे पुन्हा २00६मध्ये पदवीधर वेतनश्रेणीनुसार वेतन मिळणे सुरू झाले. परंतु पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे काही ग्रंथपालांना १४00-२६00 तर काहींना १४00-२३00 अशी वेतनश्रेणी देण्यात येत आहे. एकाच पदावर असूनही वेतनामध्ये ही भिन्नता आहे. सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे ९३००-३४८०० आणि ग्रेड पे ४३०० मिळणे अपेक्षित आहे. मात्र ती मिळालेली नाही. सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी या वेतन भिन्नतेबाबत शासनासमोर मुद्दे उपस्थित केले होते. मात्र शिक्षणमंत्री झाल्यानंतर यासंदर्भातील त्यांचीच पत्रे दाखविली असता त्यांनी कोणतीच पावले उचलली नाहीत. सार्वजनिक ग्रंथालयातून निवृत्त झालेल्या ग्रंथपालांना ना पेन्शन, ना ग्रॅच्युइटी. इतकी अवस्था वाईट आहे.’’यासंदर्भात शासनाने एक समिती स्थापन केली होती, त्यामध्ये हे अर्धवेळ पद रद्द करून पूर्णवेळ पद करण्यात यावे, अशी शिफारस केली होती. मात्र ती शिफारस स्वीकरलेली नाही. राज्यातील अर्धवेळ ग्रंथपाल पूर्णवेळ करण्यात यावेत, ग्रंथपालांना समान वेतन लागू व्हावे, जुन्या ग्रंथपालांना पेन्शन सुरू व्हावी अशा ग्रंथपालांच्या मागण्या आहेत. येत्या दीड महिन्यात यावर विचार न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला.