शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
3
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
4
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
5
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

सौरऊर्जेद्वारे सोसायटीला वीजबिलातून मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:09 IST

सौरऊर्जा वगळता सर्व ऊर्जा निर्मिती केंद्र ही लोकवस्तीपासून दूर निर्मिती करतात. त्यानंतर ही वीज सगळीकडे वाहून नेताना अनेक ...

सौरऊर्जा वगळता सर्व ऊर्जा निर्मिती केंद्र ही लोकवस्तीपासून दूर निर्मिती करतात. त्यानंतर ही वीज सगळीकडे वाहून नेताना अनेक प्रकारे खर्च होते आणि अंतिम वापरापर्यंत पोहोचताना काही प्रमाणात वाया जाते. यावर उपाय म्हणून सौरऊर्जा ही वापराच्या ठिकाणीच तयार करून वापरल्याने जास्त स्वस्त असते. या प्रकारच्या सिस्टिमला आपण पारेषण संलग्न सौर प्रणाली म्हणतो. अशा प्रकारची यंत्रणा आपण आपल्या सोसायटीमध्ये वापरल्यास बिल्डिंगमधील लिफ्ट्स, पाण्याचे पंप, क्लब हाऊसमधील दिवे, बिल्डिंगच्या आवारातील दिवे, टेरेस आणि गार्डनमधील स्ट्रीट लाईट्ससुद्धा यावर आपण चालवू शकतो.

कार्यप्रणाली

सूर्यप्रकाशाचा वापर करून वीज तयार होते. ही वीज तयार झाल्यावर उपभोक्ता गरजेप्रमाणे वापर करून अतिरिक्त वीज महावितरणला पुरवतो आणि भविष्यात गरजेनुसार परत घेतो. महावितरण वीज पुरवठा करताना ग्राहकांना तीन मुख्य प्रकारे विभागते. घरगुती ग्राहक, व्यावसायिक ग्राहक आणि निर्मिती क्षेत्रातील ग्राहक.

फायदा : ज्यांचा मासिक वापर किमान २०० युनिट्सपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी हि व्यवस्था जास्त फायदेशीर ठरते. किमान १kw ची एक सिस्टिम आपण बसवू शकतो जी आपल्याला प्रतिमहिना १२० युनिट्स तयार करून देते. आपल्या मासिक वापराचे लक्ष्य ठेवून, वीज तयार करणारी सिस्टिम आपण बसवू शकतो.

उदा : दरमहा २५० युनिट महावितरणकडून घेतले आणि २५० युनिट सोलरने परत केल्यास वीजबिल शून्य होईल. या प्रकारच्या सिस्टिमचा वापर करून आपण वीजबिल जास्तीत जास्त ९० % पर्यंत कमी करू शकतो

सौर यंत्रणा बसवण्यापूर्वी काही नियम व अटी लक्षात घेतल्या पाहिजेत.

1.महावितरणची पूर्वपरवानगी घेणे अत्यावश्यक

2.उपभोक्ता क्रमांकाचा मंजूर भार सिस्टिमचा आकार ठरवतो.

3.सदर सिस्टिम बसवण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

4.जेवढा वापर तेवढीच ऊर्जा निर्मिती करणे

5.दरमहा स्थिर आकार आहे त्याप्रमाणे येत राहील.

6.महावितरण २० वर्षांचा करार करते.

खर्च

सुरुवातीचा खरेदी खर्च हा थोडा मोठा वाटू शकतो. पण दरमहिना होणारी बचत, पहिल्या तीन ते साडेतीन वर्षात याची परतफेड करून देते, शिवाय यासाठी कर्ज देणाऱ्या बँक उपलब्ध आहेत. खासगी गृहरचना संस्था (सोसायटी) साठी हा सर्वात फायदेशीर ठरतो. उदा: १० kw सिस्टमचा खर्च ६.५० लाखपर्यंत असून दरमहा २०,०००/- बचत होऊ शकते. अशाप्रकारच्या सिस्टमचा वार्षिक रखरखाव खर्च अंदाजे ५०००/- असू शकेल.

सिस्टिमचे आयुष्य

सिस्टिमचे तीन मुख्य भाग आहेत.

•सोलर पॅनेल्स, इन्व्हर्टर आणि वायरिंग

•सोलर पॅनेल्सला १० वर्षे ते २५ वर्षे warranty असते .

• तर इन्व्हर्टरला ५ वर्षांची वॉरंटी आणि २० वर्षांपर्यंत आयुष्य असते. २० वर्षांचा विचार करून उत्तम उपकरण निवडल्यास किमान २० वर्षे वीजबिल मुक्त होऊ शकतो.

अक्षय पांचाळ

सौरयंत्रणा तज्ज्ञ