शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर खूनप्रकरणी नरेंद्र मोदींना पत्र

By admin | Updated: January 21, 2016 00:22 IST

अविनाश पाटील : सीबीआयच्या ‘एसआयटी’कडून तपास करण्याची मागणी

सातारा : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास गतिमान करण्यासाठी तो सीबीआयच्या एसआयटीकडून करावा, अशा मागणीचे पत्र पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिण्यात आले असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याामध्ये अंनिस कार्यकर्त्यांच्या वतीने हे निवदेन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात येणार आहे,’ अशी माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.पत्रकात म्हटले आहे की, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घृण खून होऊन २९ महिने पूर्ण झाले. कॉ. गोविंद पानसरे यांचादेखील २० फेब्रुवारी रोजी खुनी हल्लयामुळे मृत्यू झाला. या घटनेलादेखील अकरा महिने पूर्ण झाले. अशापद्धतीने कर्नाटकातीलप्रा. कलबुर्गी यांचाही खून करण्यात आला. कॉ. गोविंद पानसरे खून तपासामध्ये झालेली समीरगायकवाड या सनातन संस्थेच्या साधकाची अटक आणि त्यावर दाखल झालेले आरोपपत्र सोडता तपासामध्ये फारशी प्रगती नाही, हे अत्यंत वेदनादाई आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुलावर जिथे नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला तेथे तसेच राज्यभर बुधवारी निदर्शने करण्यात आली.महाराष्ट्र अंनिस तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिण्यात आलेल्या पत्रामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास अधिक वेगाने होण्यासाठी सीबीआयच्या स्पेशल इनव्हेस्टीगेशन टीम (एसआयटी) ची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिना बोरा हत्या प्रकरणामध्ये चार तपासटीम आणि व्यापाम घोटाळ्यासाठी चाळीस टीमची नेमणूक करणाऱ्या सीबीआयला डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासासाठी चारपेक्षा अधिक अधिकारी देता येत नाहीत, असाही आरोप करण्यात आला आहे.दाभोलकर,पानसरे आणि कलबुर्गी यांच्या खुनांच्या घटनांमध्ये अनेक साम्य असल्याचे पुरावे समोर येत असूनदेखील तपास यंत्रणांच्यामध्ये पुरेसा समन्वय दिसून येत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन या तीनही खुनाचा तपास करणाऱ्या यंत्रणामध्ये समन्वय साधण्यात पुढाकार घ्यावा. डॉ.दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाई संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यकर्ते व कुटुंबीय भेटणार आहेत.’ असेही शेवटी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) आता जातपंचायती विरोधातील कायद्यासाठी लढा !डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास लागला नसला तरी कार्यकर्त्यांनी निर्धाराने आपले काम सुरू ठेवले आहे. जादूटोणाविरोधी कायदा पारित होऊन दोन वर्षे झाली. जादूटोणा कायद्याखाली आत्तापर्यंत दोनशेपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. ही चळवळ थांबली नसल्याचे निर्देशांक आहे. पुढच्या टप्यावर जातपंचायतीच्या विरोधातील कायद्यासाठी अंनिस प्रयत्नशील राहणार असल्याचेही पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.