शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागेत पत्र्याच्या कोठ्या

By admin | Updated: July 3, 2017 03:25 IST

कात्रज येथील राजस सोसायटीच्या अ‍ॅमिनिटी स्पेसच्या जागेत नव्याने तयार झालेल्या कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने

लोकमत न्यूज नेटवर्ककात्रज : कात्रज येथील राजस सोसायटीच्या अ‍ॅमिनिटी स्पेसच्या जागेत नव्याने तयार झालेल्या कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी पत्र्याच्या कोठ्या उभारण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र येथील स्थानिक नागरिक, नगरसेवक वसंत मोरे तसेच नगरसेवक प्रकाश कदम यांनी यासाठी विरोध केला आहे. त्यामुळे क्षेत्रीय अधिकारी व नगरसेवकातील हा वाद विकोपाला जाण्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय पुणे महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आले आहे. या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग ३८ हा येतो. प्रभाग ३८ मधील राजस सोसायटीमध्ये सर्वे नं. २२/१ मध्ये कमलासिटी सोसायटीची १० गुंठे असलेली ही अ‍ॅमिनिटी स्पेसची जागा पालिकेला हस्तांतरित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पालिकेकडून ओटा मार्केटचे आरक्षण टाकण्यात आलेले आहे. मात्र सध्या त्या ठिकाणी गणपती विसर्जन हौद बांधण्यात आलेला आहे. या ठिकाणी असलेल्या गणेश विसर्जन हौदात सुखसागरनगर भाग १ व २, राजस सोसायटी, विद्यानगर, महावीरनगर, आनंदनगर परिसरातील सुमारे तीन ते चार हजार गणपतींचे विसर्जन होते. त्यामुळे कात्रज तलावावरील विसर्जनाचा ताण कमी होतो. महिनाभरावर गणेशोत्सव आला आहे. मात्र या ठिकाणी जर स्थापत्य कोठ्या झाल्या तर या भागातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा यासाठी विरोध होत आहे. येथील नागरिकांनी हे काम थांबण्यासाठी या संदर्भात मनसे गटनेते वसंत मोरे व नगरसेवक प्रकाश कदम यांना निवेदन देऊन सदरचे काम थांबवण्याची मागणी केली. त्यानुसार दोन्ही नगरसेवकांनी जागेची पाहणी करत काम थांबविण्याची सूचना क्षेत्रीय कार्यालय प्रशासनाला दिल्या आहेत.नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितले, की पुणे महानगरपालिकेने अ‍ॅमेनिटी स्पेसची जागा ही नागरिकांना सेवा मिळेल, या हेतूने ताब्यात घेतलेली असते. येथील नागरिकांना सुविधा देणाऱ्या गोष्टीच या ठिकाणी झाल्या पाहिजेत. या प्रभागात माऊली गार्डन व पॅरामाऊंट गार्डन येथे दोन मोठ्या जागा पालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत व त्या मुख्य रस्त्यालगत देखील आहेत. मात्र या जागेवर काही खाजगी व्यक्तींचे अतिक्रमणे केलेली आहेत. या जागेवर पालिकेने या कोठ्या उभाराव्या. मात्र राजस सोसायटी येथील जागेवर सध्या विसर्जन हौद आहे. याचा उपयोग येथील नागरिकांना होत असताना क्षेत्रीय अधिकारी नितीन उदास यांनी याच ठिकाणी कोठ्या उभारण्याचा हट्ट का धरला आहे. या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी असलेल्या जागेवर पालिकेने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नितीन उदास यांना निलंबीत करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार आहे. वेळ पडली तर न्यायालयातदेखील धाव घेणार.नगरसेवक प्रकाश कदम यांनी सांगितले, की नागरिकांना अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागेवर त्यांना अपेक्षीत सुविधा उपलब्ध करून देणे पालिकेचे कार्य आहे. मात्र पालिका अधिकारी त्यांची सोय या ठिकाणी पाहू लागले आहेत. या नवीन क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या मुख्य रस्त्यालगत २० गुंठ्यांची जागा पालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याचा ताबा पालिकेकडे नाही. त्या जागा भाड्याने दिल्या जात आहेत. याकडे अधिकाऱ्यांनी आधी लक्ष द्यावे व या ठिकाणी आपल्या कोठ्या कराव्यात. राजस सोसायटीच्या त्या अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागेत गणपती विसर्जन हौद आहे. त्या ठिकाणी इतर काही अतिक्रमण करू नये, अन्यथा मोठे जनआंदोलन उभारावे लागेल.बांधकाम नसून तात्पुरत्या कोठ्याक्षेत्रीय अधिकारी नितीन उदास यांनी सांगितले, की सध्या अधिकाऱ्यांना प्रभाग माहिती नाही. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात या कोठ्या बांधणार आहोत. येथे आम्ही कुठलेही बांधकाम करणार नसून फक्त पत्र्याच्या कोठ्या उभारणार आहोत. काही कालावधीनंतर आम्हाला जागा मिळाल्यास त्या कोठ्या तातडीने त्या ठिकाणाहून हलवणार आहोत. सध्या स्थापत्य विभाग नेहरू स्टेडियमवरून या भागात येऊन काम करतो आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कर्मचाऱ्यांचा वेळदेखील वाया जात आहे. तसेच हे काम करण्यासाठी पालिका उपायुक्तांची परवानगी घेतली आहे.