शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चला, गाव पाणीदार करू या !

By admin | Updated: April 10, 2017 02:06 IST

सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली असून

जेजुरी : सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली असून, पुरंदर तालुक्यात चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. साकुर्डे (ता. पुरंदर) येथे सुमारे दोनशे ग्रामस्थांनी श्रमदानाचा शुभारंभ करीत गाव पाणीदार करण्याचा निश्चय केला आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे निवडलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि पुरंदर हे दोन तालुके स्पर्धेसाठी निवडलेले आहेत. पुरंदर तालुक्यातील अनेक गावे या स्पर्धेत सहभागी झालेली आहेत. दुष्काळमुक्त गाव करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले असून, यात लोकसहभागाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. राज्यात प्रथम येणाऱ्या गावाला ५० लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या गावांसाठी अनुक्रमे ३० लाख व २० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यात प्रथम येणाऱ्या गावासाठी १० लाखांचे बक्षीस असून, या स्पर्धेत पुरंदर तालुक्यातील एकूण ३३ गावांनी सहभाग घेतला आहे. शनिवारपासून २० गावांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याची माहिती पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सुरेश सस्ते यांनी सांगितली. पाणी फाउंंडेशनचे पुरंदरचे समन्वयक सुरेश सस्ते यांच्या उपस्थितीत श्रमदानाला सुरुवात केली. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती नीलेश जगताप, खरेदी-विक्री संघाचे संचालक संग्राम सस्ते, सरपंच तृप्ती जगताप, माजी सरपंच माईसाहेब सस्ते, सदस्या सविता जगताप, सदस्य सचिन थोपटे, माजी उपसरपंच राजेंद्र सस्ते, सदाशिव सस्ते, सुरेशनना सस्ते, वामन सस्ते, राजेंद्र जाधव, पोपट जगताप, किसन देशमुख एकनाथ सस्ते आदी उपस्थित होते. गावातील मतभेद, हेवेदावे, राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्वजण एक दिलाने गाव पाणीदार बनवू, अशी प्रतिज्ञा यावेळी ग्रामस्थांनी घेतली. संपूर्ण तालुक्यात साधारणपणे २००० जणांनी श्रमदानास सुरुवात केली आहे. आज ३००० ग्रामस्थांचा सहभाग दिसला. येत्या आठवडाभरात संपूर्ण तालुक्यात २५ हजारांवर लोकांचा गावा-गावांतून सहभाग दिसेल.  दररोज श्रमदानाला प्रतिसाद वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. यात साकुर्डे येथील ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवला.  पहिल्या दिवशी दोनशे ग्रामस्थांनी सहभाग घेतला, तर आज सुमारे सुमारे चारशे ग्रामस्थांनी हजेरी लावली. यात महिलांचा सहभाग मोठा होता.