शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

चला भीमा नदीला प्रदूषणापासूून वाचवू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:11 IST

सह्याद्री पर्वतांमधून महाराष्ट्राची भूमी सुजलाम् सुफलाम् करणारी अमृतवाहिनी भीमानदी बाहेर पडली आहे. भीमाशंकर येथून उगम पावलेली ही नदी कृष्णेपर्यंत वाहात जाते. मात्र तिला ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा झाल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभीमाशंकर : सह्याद्री पर्वतांमधून महाराष्ट्राची भूमी सुजलाम् सुफलाम् करणारी अमृतवाहिनी भीमानदी बाहेर पडली आहे. भीमाशंकर येथून उगम पावलेली ही नदी कृष्णेपर्यंत वाहात जाते. मात्र तिला ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा झाल्याचे वास्तव आहे. भविष्यात या प्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम जाणवणार असून नदीकाठच्या लोकांना जलसाक्षर करण्यासाठी जल बिरादरीच्या पुढाकाराने सोमवारपासून भीमाशंकर येथून जलसाक्षरता मोहीम सुरू होणार आहे. त्यानिमित्त पर्यावरणतज्ज्ञांनी चला भीमेला प्रदूषणापासून वाचवूया, असे आवाहन केले आहे.या नदीवरील अतिक्रमणं, शोषण आणि प्रदूषण यातुन तिला मुक्त करण्यासाठी तसेच पुढच्या पिढीची आणि सामान्य माणसांची नदीप्रती जबाबदारी निश्चित व्हावी, या दृष्टीने ‘नमामी चंद्रभागा जलसाक्षरता यात्रा’ सुरू होत आहे.ही नदी प्राचीन असून तिच्या साक्षीने इतिहास घडला, लोकसंस्कृती फुलली, राजकारण रंगले. मात्र आज या भीमेचे स्वरूप पूर्वीसारखे राहिले नाही. भीमाशंकरमधून उगम पावलेल्या या नदीचे रूपडे राजगुरुनगरपासून बदलत गेले आहे. मुळा, मुठा नद्यांतून येणाºया दूषित पाण्यामूळे निरभ्र स्वच्छ दिसणारे पाणी काळे होत चालले आहे, पूर्ण विळखा दिला आहे. खराब पाण्यामुळे मासे टिकत नाही, नुसते अस्वच्छ व घाण पाण्याने नदी दूषित झाली आहे.उजनीमध्ये भीमा कमालीची अस्वच्छ व प्रदूषित झाली आहे. अनेक उद्योगधद्यांचे खराब पाणी भीमेत सोडले जाते. तसेच शेतीसाठी पाण्याच्या अतिरिक्त उपसा होत असतो. वाळूउपाशाचा मोठा फटका भीमेला बसला आहे. नदीचे पात्रच बदलले आहे. धोक्याच्या बाहेर गेलेल्या भीमा नदीला वाचविण्यासाठी ही यात्रा काढली आहे. जल बिरादरीने काश्मीर ते कन्याकुमारी या कार्यक्षेत्रात १०१ ठिकाणी नदीसंवाद, जलसाक्षरता यात्रा आयोजित केल्या होत्या. विजापूर येथे देशभरातून निघालेल्या १०१ यात्रांचे समायोजन होणार असून तेथे दि. १६ ते १८ आॅगस्ट २०१७ कालावधीत डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जल संमेलन होणार असल्याचे जल बिरादरीच्या वतीने सांगण्यात आले.या यात्रेचा शुभारंभ आज भीमाशंकर येथून सकाळी १० वाजता होत असून या दरम्यान नमामी चंद्रभागा उपक्रमाच्या कृती नियोजनाबाबत लोकसंवाद, विद्यार्थी संवाद, संत वारकारी संप्रदाय प्रतिनिधींशी चर्चा असे कार्यक्रम होणार आहेत. ८ आॅगस्ट रोजी मंचर, राजगुरूनगर, ९ रोजी देहू, आळंदी , १० रोजी पुणे, ११ रोजी यवत, केडगाव, पाटस व दौंड, १२ रोजी कुरकुंभ, भिगवण, पळसदेव, रांजणी, अकोले, नीरा नरसिंहपूर, १३ रोजी पंढरपूर, दि.१४ रोजी सोलापूर येथे यात्रा पोहचणार असल्याचे पुणे वन्यजीव विभागाच्या सहायक वनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे यांनी सांगितले.काय आहे भीमा नदीचा इतिहास?सध्या भीमाशंकर मंदिराकडे जाताना पायºयांपासून डाव्या बाजुला उंच टेकडीवर एक मंदिर व मंदिराच्या बाजुला कुंड आहे. या कुंडाला भीमकुंड म्हणतात. हे कुंड पुरूषभर खोल असून त्यामध्ये जिवंत पाझर आहे. याच ठिकाणी भीमेचा मूळ उगम आहे.भीमाशंकरमधून निघालेल्या भीमेच्या प्रवाहाला अनेक लहान मोठे ओढे, नद्या मिळतात व हळुहळू भीमेचे पात्र मोठे होत जाते. पुण्यापासून ईशान्य दिशेला तुळापूर या ठिकाणी देहू आळंदीच्या संतभूमीतून आलेली इंद्रायणी भीमेला मिळते. भीमेच्या तेजस्वी पाण्यावर चासकमान, उजनीसारखी मोठी धरणे झाली आहेत. या पाण्याने लाखो हेक्टर शेती आज ओलीता खाली आली आहे.