शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’चे १७८ कर्मचारी परत द्या

By admin | Updated: April 11, 2017 03:37 IST

पुणे महापालिकेला दणका दिल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करणाऱ्या पीएमपीच्या १७८ कर्मचाऱ्यांनाही परत बोलाविले आहे.

पुणे : पुणे महापालिकेला दणका दिल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करणाऱ्या पीएमपीच्या १७८ कर्मचाऱ्यांनाही परत बोलाविले आहे. पीएमपी प्रशासनाने याबाबतचे पत्र सोमवारी पालिका आयुक्तांना दिले आहे. दोन दिवसांत हे कर्मचारी कार्यमुक्त करावेत, असे पत्रात नमुद करण्यात आल्याचे समजते.पीएमटी व पीसीएमटीचे २००७ मध्ये विलीनीकरण होवून पीएमपीची निर्मिती झाली. त्यावेळी पीएमटी व पीसीएमटीचे काही कर्मचारी अनुक्रमे दोन्ही पालिकांमध्येच कार्यरत राहिले. तेव्हापासून आजतायगायत हे कर्मचारी पीएमपीऐवजी पालिकांचीच चाकरी करत होते. पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पीएमपी सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. बेशिस्त कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यापासून निलंबित करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. भांडार व्यवस्थापकांचे निलंबन करून त्यांनी अधिकाऱ्यांनाही एकप्रकारे इशारा दिला आहे. तसेच पुणे पालिकेत कार्यरत असलेल्या पीएमपीच्या ८३ कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. आतापर्यंत एकाही अधिकाऱ्याने हा निर्णय घेतला नव्हता. पुणे पालिकेनंतर मुंढे यांनी आता पिंपरी चिंचवड पालिकेला दणका दिला आहे. पालिकेत काम करणाऱ्या १७८ कर्मचाऱ्यांना त्यांनी परत सेवेत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशासनाने याबाबतचे पत्र सोमवारी पालिका आयुक्तांना पाठविले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये १७३ कर्मचारी हेल्पर व क्लीनर या पदावरील असून ५ चालक आहेत. मात्र, १७३ कर्मचारी पालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये लेखनिक तसेच इतर कामे करीत आहेत. पालिकेच्या रुग्णालयांमध्येही काही कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे वेतन मात्र पालिकाच देत असल्याचे समजते. या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत मुक्त करावे, असे प्रशासनाने दिलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)