शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उजनीचे दरवाजे बंद करू

By admin | Updated: January 20, 2016 01:23 IST

उजनी धरणात पाणी सोडण्यास शिरूर, खेडच्या शेतकऱ्यांचा विरोध मावळल्यानंतर आता उजनीतून खाली पाणी सोडण्यास इंदापूरचे शेतकरी

इंदापूर : उजनी धरणात पाणी सोडण्यास शिरूर, खेडच्या शेतकऱ्यांचा विरोध मावळल्यानंतर आता उजनीतून खाली पाणी सोडण्यास इंदापूरचे शेतकरी विरोध करीत आहेत. जर भीमा नदीपात्रात पाणी सोडले तर उजनीचे दरवाजे बंद करू, असा इशारा दिला आहे. भीमा नदीच्या पात्रात सोडण्यास मनाई करावी. पाणी सोडल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा सोनाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला आहे. उजनी धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्याला देण्याकरिता पुन्हा हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. सध्या जलाशयात मृतसाठा शिल्लक आहे. शंभर ते दीडशे गावांच्या पाणीपुरवठा योजना यावर अवलंबून आहेत. पुढील सात महिने पाणी पिण्याकरिता वापरावे लागणार आहे. ७ नोव्हेंबर २०१५ ला पुण्याचे विभागीय आयुक्तांनी उजनी धरणातील पाणी सोलापूरला पिण्याकरिता ४ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. त्या वेळी इंदापूर तालुक्यातील जनतेने सर्वपक्षीय मोर्चा काढून १८ नोव्हेंबर रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. त्या वेळी जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. पुन्हा पाणी सोडले तर हजारो धरणग्रस्तांचा मोर्चा उजनी धरणावर नेऊन उजनीचे दरवाजे बंद केले जातील, असा इशारा माने यांनी दिला आहे. (वार्ताहर)