शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

साहित्याचा उत्सव दिमाखात करणार

By admin | Updated: December 7, 2014 00:46 IST

संत नामदेव यांच्या भूमीतून साहित्यिक, रसिक घुमान येथे येत आहेत ही आमच्या दृष्टीने खूप आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे.

पुणो : संत नामदेव यांच्या भूमीतून साहित्यिक, रसिक घुमान येथे येत आहेत ही आमच्या दृष्टीने खूप आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. मराठी साहित्य संमेलनाबाबत स्थानिक नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. गाव लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असले तरी प्रत्येक घरात किमान दहा-दहा लोकांच्या राहण्याची सुविधा होऊ शकते. साहित्याचा हा उत्सव मोठय़ा दिमाखात साजरा करू, असा विश्वास घुमान गावचे सरपंच हरबन्ससिंग यांनी व्यक्त केला.
यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे होत आहे.  संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका असलेल्या संत नामदेव समितीचे मुख्य समन्वयक, सरपंच हरबन्ससिंग यांचा साहित्य महामंडळातर्फे शनिवारी सत्कार करण्यात आला.  साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हरबन्ससिंग यांचा सत्कार महामंडळातर्फे करण्यात आला.  या वेळी महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन तसेच ज्येष्ठ कवी रामदास फुटाणो, संमेलनाचे संयोजक भारत देसडला, संजय नहार, सुखदेव सिंग, सतनाम सिंग, सतसिंग मोखा, पुणो विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाच्या माजी पदाधिकारी डॉ. वीणा मनचंदा उपस्थित होते.  घुमानला राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करावे, यासाठी 1क्-15 वर्षापासून प्रय} सुरू आहेत. तसे जर झाले तर ती संमेलनाची फलश्रुती ठरेल. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी संमेलच्या उद्घाटन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून येण्याचे मान्य केले आहे. तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गुरुदयालसिंग, प्रा. रहेमान राही, केदारनाथ सिंग संमेलनास उपस्थित राहणार आहेत. राज्यातून पाच ते सात हजार रसिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असे देसडला म्हणाले.  (प्रतिनिधी)
 
4संत नामदेव यांच्याविषयी आमच्या मनात फार आदराची भावना आहे. मराठी संमेलन घुमान येथे होत असल्याने आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे संमेलनाच्या तयारीला दोन महिन्यांपासून सुरुवात केली आहे.  घुमानचे वैशिष्टय़ म्हणजे सर्वधर्मसमभाव जपणारी ही भूमी आहे. येथे एकाच छताखाली शिव भगवान, संत नामदेव आणि गुरुग्रंथसाहिबा आहे. संमेलनाला येणा:या प्रत्येकाचे योग्य त:हेने आदरातिथ्य राखू, त्यात कुठलीही कमतरता राहणार नाही. संमेलनाची रूपरेषा अद्याप निश्चित झालेली नसली, तरी पंजाबच्या संस्कृतीचे दर्शन यात निश्चित घडेल,     असे हरबन्ससिंग म्हणाले.