शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रोजगारक्षम कौशल्य शिक्षणाचे मिळणार धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:14 IST

मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) वतीने आठवी आणि दहावी पास उमेदवारांना रोजगाराभिमुख कौशल्य शिक्षण देण्यात येणार आहे.

पुणे : मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) वतीने आठवी आणि दहावी पास उमेदवारांना रोजगाराभिमुख कौशल्य शिक्षण देण्यात येणार आहे. उत्पादन, रिटेल आणि आॅटोमोबाईल यांसारख्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधीचे दार त्यामुळे खुले होणार आहे.एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. एमसीसीआयएचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष गिरीश बापट, कार्यवाह सुजला वाटवे, अस्पायर नॉलेज अ‍ॅण्ड स्कील्स इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी, एमईएस गरवारे महाविद्यालयाचे डॉ. आनंद लेले या वेळी उपस्थित होते.अस्पायर नॉलेज कंपनीच्या सहकार्याने एमसीसीआयएच्या भोसरी येथील केंद्रात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २०१९-२० या कालावधीत ५० लाख कौशल्यक्षम रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण हाती घेतले आहे. त्या अंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मध्यम स्वरूपाच्या उद्योगांची गरज लक्षात घेऊन कौशल्यक्षम प्रशिक्षण उमेदवारांना देण्यात येणार आहे. या वर्षी प्रत्येकी २५ उमेदवारांचे ३ वर्ग घेण्यात येतील. या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असून, उद्योगांमध्ये रोजगार संधीदेखील उपलब्ध करून दिल्या जातील. गेल्या आर्थिक वर्षात ८०० उमेदवारांना कौशल्य शिक्षण देण्यात आले असून, त्यातील ९० ते ९५ टक्के उमेदवारांना रोजगार मिळाला असल्याची माहिती डॉ. सरदेशमुख यांनी दिली.याच उपक्रमांतर्गत एमईएस गरवारे महाविद्यालयात बीबीए शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० तासांचा विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आला आहे. यात ४० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. उद्योगाविषयीचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा हा या मागे हेतू असल्याचे डॉ. लेले म्हणाले.ज्ञानप्रबोधिनी घेणार उद्योजकता कलचाचणीव्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक क्षमता, कल, प्रेरणा आणि जोखीम स्वीकारण्याची वृत्ती आवश्यक असते. तसेच त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करणे आणि निर्णयक्षमता असणे महत्त्वाचे असते.उमेदवारांमध्ये नक्की कोणते गुण आहेत, उद्योजकतेसाठी पूरक क्षमता त्यांच्यात आहे की नाही, याची कलचाचणी ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने केली जाणार आहे.पदवीपूर्व, पदव्युत्तर विद्यार्थी, व्यवस्थापन व उद्योजकता यासंबंधी अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना ही कलचाचणी उपयोगी ठरेल. एमसीसीआयएच्या सहकार्याने हे मार्गदर्शन केंद्र चालविण्यात येणार आहे.