शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या पकडणारच; पण खबरदारीही घ्या

By admin | Updated: May 11, 2017 04:08 IST

बिबट्या पकडण्यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याने वनविभागाने गंभीर पावले उचचली आहेत. वनविभागाच्या वतीने

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : बिबट्या पकडण्यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याने वनविभागाने गंभीर पावले उचचली आहेत. वनविभागाच्या वतीने गावामध्ये दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली. यामध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बिबट्याचे हल्ले नैसर्गिक आपत्ती असल्याने वनविभागाबरोबरच पोलीस, महसूल, ग्रामसेवक हे एकत्र आले, तर बिबट्या जेरबंद होण्यास मदत मिळणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी सांगितले.शिरूर वनपरिक्षेत्राचा तुषार ढमढेरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वढू बुद्रुक येथील रतन भंडारे यांची भेट घेत त्यांच्यावर झालेल्या औषधोपचाराचा सर्व खर्च वनविभाग देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर गावातील प्रत्येक वस्तीवर जाऊन त्यांनी नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना सांगितल्याने नागरिकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली आहे. या वेळी ढमढेरे यांच्यासह वनपाल बी. आर. वाव्हळ, वनरक्षक सोनल राठोड, ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे, माजी सदस्य संजय भंडारे, सोसायटीचे माजी अध्यक्ष कुंडलिक भंडारे, स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, अशोक भंडारे, श्रीकृष्ण गुरव, राहुल भंडारे उपस्थित होते.वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी सांगितले, की शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने न जाता समूहाने जावे, शेतात जाताना सोबत फटाके किंवा मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी लावावीत, हातात काठी व बॅटरी असावी, महिलांनी शेतात काम करताना विरुद्ध दिशेकडे तोंड करून काम करावे, जेणेकरून बिबट्याची हालचाल लक्षात येईल, अशा विविध प्रकारच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या. तीन पिंजरे वढूक्षेत्रात लावले असून इन्फ्रारेड कॅमेरे बसविण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. रात्र गस्तीसाठी अधिक कर्मचारी तैनात केले आहेत.