शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळ येथे बिबट्या जेरबंद

By admin | Updated: May 7, 2016 05:10 IST

येथील हाडकी हाडवळा परिसरात वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी (दि. ६) पहाटे नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. या परिसरातील ही दुसरी घटना आहे.

बेल्हा : मंगरूळ (ता. जुन्नर) येथील हाडकी हाडवळा परिसरात वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी (दि. ६) पहाटे नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. या परिसरातील ही दुसरी घटना आहे. हाडकी हाडवळा परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. या भागातील लोकांना बिबट्याचे केव्हाही दर्शन होत होते. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. लहान मुलांना ग्रामस्थ स्वत:ची कामे बाजूला ठेवून गाडीवरून शाळेत पोहोचवत आहेत. या परिसरातील आंबेविहीर येथे दि. ११ फेब्रुवारी २०१६ रोजी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कविता कुंभार (वय ३२) या जखमी झाल्या होत्या. त्यानंतर खराडेमळा येथे दि. १६ एप्रिल २०१६ रोजी शेतात जनावरांसाठी चारा कापणाऱ्या सगुणाबाई खराडे (वय ५५) यांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून उसाच्या शेतात ओढत नेऊन जागेवरच ठार केले होते. त्यानंतर वन खात्याने या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते. परिसरातीस कुत्री, रानडुकरे तसेच पाळीव जनावरांवर बिबट्याचे हल्ले चालूच आहेत. पिंजरे लावूनही बिबट्या जेरबंद होत नव्हता. वन खात्याचे कर्मचारीही हतबल झाले होते. मात्र, त्यानंतर दि. १७ एप्रिल २०१६ रोजी आंबेविहीर परिसरात वन खात्याने संजय चिमाजी लामखडे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. त्या ठिकाणी पूर्ण वाढ झालेली बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली होती. यानंतर शुक्रवारी (दि. ६) पहाटे नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्याचे वय अंदाजे १२ वर्षे आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रात हलविले.