शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काठापूरला बिबट्या जेरबंद

By admin | Updated: July 16, 2016 01:01 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बु. येथे अनेक जनावरांना फस्त करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर हजारो खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे औरंगाबादकर जाम कंटाळले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. या अंदाजपत्रकाला कडाडून विरोध दर्शविण्याचे काम मनपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केले. कंत्राटदारांमार्फत पॅचवर्कचे काम करण्यापेक्षा मनपाने ३ कोटी रुपये खर्च करून स्वत:चा डांबर प्लँट उभारावा, असा आग्रह सुरू आहे. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनीही मनपाला स्वत:चा डांबर प्लँट उभारणे शक्य नसल्याचे जाहीर करून वादात आणखी तेल ओतले आहे.सहा महिन्यांपूर्वी प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपाने स्वत:चा डांबर प्लँट उभारावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मनपा अधिकारी प्रारंभापासूनच डांबर प्लँट उभारणे अशक्य असल्याचे सांगत आहेत. चार दिवसांपूर्वी महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी सांगितले की, पॅचवर्क करण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. निविदा काढून पाऊस थांबल्यावर ही कामे करण्यात येणार आहेत. महापौर त्र्यंबक तुपे आणि सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी कंत्राटदारांकडून पॅचवर्क नको म्हणून कडाडून विरोध केला. मनपाने स्वत:चा डांबर प्लँट सुरू करावा, अशी सूचना त्यांनी केली. शुक्रवारी पुन्हा महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापतींनी आयुक्तांना पत्र दिले. या पत्रात मनपाने स्वत:चा डांबर प्लँट त्वरित उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्लँटसाठी ३ कोटींची अर्थसंकल्पात तरतूदही आहे.मनपाला परवडणार नाही....सायंकाळी पत्रकारांशी बोलताना आयुक्त बकोरिया यांनी सांगितले की, डांबर प्लँट उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. संगणकीय पद्धतीचा प्लँट सांभाळण्यासाठी कर्मचारी, डांबर कुठे वापरले, साहित्य खरेदीच्या नोंदी ठेवणे हे सर्व काही करणे मनपाला परवडणारे नाही. कंत्राटदारांमार्फतच गुणवत्तेचे काम करून घेणे कधीही सोयीचे आहे. आयुक्तांकडून खरडपट्टीमागील महिन्यात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी रस्त्यांची कामे न करणाऱ्या कंत्राटदारांची यादी तयार करा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. मागील पंधरा दिवसांमध्ये अधिकाऱ्यांनी यादीच तयार केली नाही. शुक्रवारी आयुक्तांनी या मुद्यावर अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे.कारवाईची मागणीशहरातील खराब रस्त्यांना मनपातील कंत्राटदार आणि अधिकारी जबाबदार आहेत. अनेक महापालिकांनी खराब रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई सुरू केली आहे. महापालिकेनेही असेच धाडसी पाऊल उचलून गुळगुळीत रस्ते तयार करून द्यावेत, अशी मागणी आ. इम्तियाज जलील यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.