शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची मादी जेरबंद

By admin | Updated: April 18, 2016 02:55 IST

मंगरुळ (ता. जुन्नर) येथील आंबेविहीर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी आज (दि. १७) पहाटेच्या सुमारास जेरबंद झाली.

बेल्हा : मंगरुळ (ता. जुन्नर) येथील आंबेविहीर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी आज (दि. १७) पहाटेच्या सुमारास जेरबंद झाली.आंबेविहीर परिसरात बिबट्याचे वास्तव्य काही दिवसांपासून आहे. ह्या भागातील लोकांना बिबट्याचे केव्हाही दर्शन होत होते. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. लहान मुलांना ग्रामस्थ स्वत:ची कामे बाजूला ठेवून गाडीवर शाळेला सोडत आहेत. बिबट्याची दहशतच या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. या परिसरात दि. ११ फेब्रुवारी २०१६ रोजी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कविता कुंभार (वय ३२) या जखमी झाल्या होत्या. त्यानंतर वनखात्याने या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते. बिबट्याचे आंबेविहीर परिसरातील कुत्रे, रानडुकरे तसेच पाळीव जनावरांवर हल्ले चालूच होते. पिंजरे लावूनही त्यात बिबट्याच येत नव्हता. वनखात्याचे कर्मचारीही हतबल झाले होते.वनखात्याने संजय चिमाजी लामखडे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. मात्र तब्बल दोन महिन्यांनंतर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. हा मादी जातीचा बिबट्या असून पूर्ण वाढ झालेला बिबट्या आहे. ह्या बिबट्याला वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी माणिकडोह निवारा केंद्रात हलविले.(वार्ताहर)शनिवारी (दि. १६) शेतामध्ये जनावरांसाठी चारा कापणाऱ्या खराडेमळा येथील सगुणाबाई दादाभाऊ खराडे (वय ५५) ह्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून तिला उसाच्या शेतात ओढत नेऊन तिला जागेवरच ठार केले. त्याच्या पार्श्वभूमीवर वनखात्याने ह्या भागात सहा पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी लावले आहेत. अजूनही ह्या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे वनखात्याकडून सांगण्यात आले.